ठाणे-पडघा रस्ता आठपदरी करा अनिल भालेराव यांचे ना.नितीन गडकरी यांना निवेदन

 ठाणे-पडघा रस्ता आठपदरी करा
अनिल भालेराव यांचे ना.नितीन गडकरी यांना निवेदन

----------------------------------------

नाशिक- मुंबई- आग्रा महामार्गावरील ठाणे ते पडघा हा रस्ता आठपदरी करावा,अशी मागणी करणारे निवेदन नाशिक भाजपा मा.उपाध्यक्ष अनिल भालेराव यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना दिल्ली भेटीच्यावेळी प्रत्यक्ष सादर केले.

     मुंबई-आग्रा महामार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते.मुंबईहून नाशिकला जातांना ठाण्याच्या उड्डाणपुलावर अहमदाबाद,सुरतकडून नाशिक,पुणे,मुंबईच्या दिशेने येणारी सर्व वाहने घोडबंदर रोडने येतात आणि तेथे वाहतुकीची प्रचंड कोंडी होते.तेथून पुढे नाशिककडे जाणारा रस्ता चारपदरी आहे.परंतु अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांची होणारी गर्दी पुढे नाशिक ते धुळे आणि जळगाव ते नागपूरपर्यंत उर्वरित महाराष्ट्र किंवा बाहेरच्या राज्यातील रस्त्याने मुंबईकडे जाणारी बहुतांश खासगी वाहने याच मार्गाने ये जा करतात.त्यामुळे प्रचंड वाहतूक असते,त्यात एखादे वाहन नादुरुस्त झाल्यास रस्त्यावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागणे हे तर नित्याचेच झाले आहे.मुंबई-आग्रा महामार्गावर 35 वर्षांपूर्वी ठाणे ते भिवंडी हा रस्ता चौपदरी झाला.परंतु तोच रस्ता सद्या या महामार्गाचा बॉटलनेक झाला आहे.त्यामुळे वाहतुकीची होणारी कोंडी रोखण्यासाठी तसेच अपघात टाळण्यासाठी ठाणे ते पडघा टोल नाक्यापर्यत चा महामार्ग आठपदरी होणे ही काळाची गरज आहे त्यामुळे या प्रश्नांत तातडीने लक्ष घालण्याची विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे.

    आपल्या प्रयत्नांमुळे मुबई-आग्रा महामार्गावरील कल्याणफाटा आणि अंजूरफाटा येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलांमुळे तेथील वाहतुकीची कोंडी दूर झाली आहे याची आठवण करून देतांना नाशकात के.के.वाघ अभियांत्रिकी कॉलेज ते हॉटेल जत्रापर्यंत पूल उभारून नाशकातील वाहतूक समस्या दूर केल्याबद्दल भालेराव यांनी ना.गडकरी यांचे निवेदनात शेवटी आभार मानले आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या