जिल्हा पालघर - जव्हार तालुक्याच्या ठिकाणी नदीची जैवविविधता टिकवण्यासाठी हातेरी ग्रामपंचायतचे अनोखी उपाय .

 हातेरी ग्रामपंचायत रहिवासी यांचे अभिनंदन.

    

मोखाडा,प्रतिनिधि : रामदास गाडर

खरं तर असा निर्णय तालुका ,जिल्हा ,राज्य पातळीवर घेणे अपेक्षित आहे. पण सुरवात ही गावापासूनच व्हायला हवी .तरच प्रसार हा राज्यभर होईल .इतर गावांसाठी हा एक चांगला आदर्श आहे

जव्हार तालुक्यातील हातेरी ग्रामपंचायत हद्दीमध्ये निसर्गाच्या सानिध्यात असलेले नदी.नाले

 तलाव. ओहोळ या क्षेत्रात स्थानिक ग्रामस्थांकडून होत असलेल्या मासेमारीसाठी रासायनिक जंतुनाशके टीसीएल पावडर यासारख्या घातक द्रव्य वापरून मासेमारी करण्यास निर्बंध  घालण्यात आले आहे. त्यामुळे गाव पातळीवर ग्रामपंचायत हातेरी नदी. नाले .संरक्षण समितीची स्थापना करण्यात  आली आहे. ही समिती 17 सदस्यीय असून ग्रामस्थांनी मासेमारी केवळ जाळे टाकून करावे याकडे लक्ष ठेवण्यासाठी सध्या पावसाळा हा थांबलेला त्यामुळे आदिवासी बांधवांनी मध्ये रोजगाराची वानवा पाहायला मिळत आहे. पोट भरायचे कसे हा  विचाराने आदिवासी  बांधव  मासेमारी कडे त्यांचा कळ गेलेला आहे. पोटाची खळगी भरण्याची.रोजगाराचे  अनेक प्रश्न त्यांच्यावर ओढवली आहे .हा विचारात असतांना मासेमारी करताना रासायनिक खते टीसेल च्या साह्याने मासे पकडत असल्याने  दूषित पाणी होत आहे. त्यामुळे रासायनिक पाणी इतर जीवांना. सजीवांनवर नाहक परिणाम होत आहे .त्यामुळे अशा रीतीने होत असलेल्या मासेमारीला  ग्रामपंचायतने आळा घातला असून स्थानिक फक्त जाळी टाकून मासेमारी करू शकतात . जैव विविधता टिकवण्यासाठी हा चांगला उपाय आहे. हातेरी ग्रामपंचायतीची सगळीकडे  चर्चा रंगू लागली आहे



टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

  1. विशेष म्हणजे ही बाब सगळीकडे रुजू केली पाहिजे हातेरी ग्रामपंचायत च्या ह्या निर्णयाला आपला सपोर्ट आहे

    उत्तर द्याहटवा