अखिल भारतीय छावा संघटने तर्फे पालक मंत्र्यांना निवेदन

 अखिल भारतीय छावा संघटने तर्फे पालक मंत्र्यांना निवेदन


गंगाखेड प्रतिनिधी : राम शिंदे

       परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांना अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष छत्रपती शिंदे पाटील यांनी त्यांचा ताफा अडवून निवेदन दिले.

अतिवृष्टी मुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून त्यांना तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली.पुर परिस्थिती मुळे जिल्ह्यात शेतकरी प्रचंड मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडलेला आहे.त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना तात्काळ मदत करण्यात यावी,व त्यांना हेक्टरी 40 हजार रुपये अनुदान देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. जिल्ह्यात 7सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेल्यामुळे जमिनीचे भूस्खलन होऊन सोयाबीन, तूर, मुग, कापुस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्या मूळे बाधीत पिकांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना हेक्टरी 40हजार रू. आर्थिक मदत करण्यात यावी असे शिंदे पाटील व छावा संघटनेचे पदाधिकारी यांची मागणी आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या