गावकऱ्यांच्या वतीने पखवाज विशारद मुंजा भाऊ शिंदे यांचा सत्कार
गंगाखेड प्रतिनिधी : राम शिंदे
तालुक्यांतील मसला या छोट्याश्या गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या ह्या कर्तबवान मुलाने स्वतः च्या मेहनतीने मृदंग विशारद परीक्षेमध्ये यश प्राप्त झाले. महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक, संगीतकार, किर्तन कार यांच्या कार्यक्रमात आपला ठसा उमटविला.त्यांच्या पखवाज आवाज महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात घुमतो आहे.
गुरुवर्य श्री संत मोतीराम महाराज संस्थान श्री क्षेत्र फळा या ठिकाणी त्यांनी लहानपणापसूनच मृदंग वादनाची कला आत्मसात केली. संगीत विशारद नामदेव बुवा केंद्रे, ह. भ. प. सदानंद महाराज अध्यक्ष फळा संस्थान, मृदंग महर्षि जगदाळे गुरुजी, संगीत अलंकार बालासाहेब सूर्यवंशी इत्यादि गुनिजन मंडळींचे मार्गदर्शन व त्यांच्या अथक परिश्रमाने त्यांना ही पदवी प्राप्त झाली.
पंचक्रोशीतील सर्व लोकांना त्यांचे कौतुक वाटतं आहे,त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.या वेळी उपस्थित गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने मसला गावचे सरपंच काशिनाथ शिंदे पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष वैजनाथ राव शिंदे पाटील, जेष्ठ नेते प्रल्हादराव शिंदे पाटील, पोलीस पाटील शिवाजीराव शिंदे पाटील, समाजसेवक नामदेवराव शिंदे, सचिन शिंदे, आदी मोठ्या संख्येने गावकरी मंडळी उपस्थित होती.
1 टिप्पण्या
आपला आम्हाला सार्थ अभिमान आहे .👍👌👌💐💐 हार्दिक अभिनंदन 💐💐
उत्तर द्याहटवा