डॉ _अशोक पवार, डॉ सुनीता राठोड लिखित बंजाराचा इतिहास स्वर्णिमच
*-मा.ना.उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य*
डॉ.अशोक पवार डॉ. सुनिता राठोड पवार लिखित बंजाराचा इतिहास हा धनी ,दानी, न्यायदानी व बलिदानीचा खऱ्या अर्थाने दडलेला इतिहास स्वर्णिमच आहे .अशा शब्दात महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय जी सावंत यांनी व्यक्त केले.
तापडिया नाट्य मंदिर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या समारंभप्रसंगी डॉ. पवार दाम्पत्यांनी मागील 22 वर्षापासून दडलेला इतिहास हा कोणत्याही प्रकारची बाह्य आर्थिक मदत न घेता सुमारे दहा खंडात उघड करण्याचा केलेला प्रयत्न हा खऱ्या अर्थाने कौतुकाच्या पलिकडे आहे.अशा संशोधकाची आमच्या सारख्यांनी वेळ घेतलीं पाहिजे. सदरील आदर्श प्रत्येकांनी घेण्यासारखा आहे. विद्यापीठ पातळीवर अशा दुर्मिळ इतिहासाबद्दल संशोधन होणे गरजेचे आहे .
आमचा इतिहास मोठ्या प्रमाणात दडविला गेलेला आहे किंवा वस्तुस्थितीचा विपर्यास केलेला आहे . एखांदा क्षेत्राचा डोबळ अभ्यास करणे वेगळे व नवीन एक क्षेत्र हाती घेऊन ते बहुविद्यासाखिय दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून पूर्ण करणे हे अत्यंत कठीण काम आहे.
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या डॉ.गणेश देवी सारख्या ख्यातकीर्त संशोधकाने पहिल्या खंडासाठी भूमिका लिहिणे यामध्ये सदरील विषयाचे स्वर्णिम सत्य लपलेले आहे.
दीडशे वर्षांपूर्वी जेम्स टॉड यांनी हाती घेतलेले कार्य डॉ. पवार दांपत्य पूर्ण करीत आहे. सदरील दहा खंड हे वेगवेगळ्या भाषेमध्ये देखील प्रकाशित प्रकाशित होणे गरजेचे व प्रासंगिक आहे . केलेल्या कामावर देखील संशोधन झाले पाहिजे व होत आहे. हिंद-ए- रत्न मल्लूकी बंजारन व लक्खीशाह बंजारा या दोन खंडावर जर चित्रपट निर्मिती होत असेल, तर हे अत्यंत दैदिप्यमान कार्य आहे. आम्ही उभ्या करत असलेल्या संत पीठा इतकेच ते महत्त्वाचे आहे त्याचे उच्च शिक्षण विभाग स्वागतच करतो आहे. अशा शब्दात ना.सामंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रस्तुत कार्यक्रमासाठी डॉ. अशोक पवार यांनी प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मा.ना .भुमरे पाटील,आ. अंबादास दानवे ,आ.संजय शिरसाट, रणजित पवार, डॉ.विशाल तायडे, डॉ कृष्णा राठोड,रवीकांत राठोड, डॉ.राणी पवार, डॉ वैशाली जहागीरदार, उत्तम राठोड, रविंद्र जंजाळ ,प्रमोद कुमावत आदी उपस्थिती होती.सत्रसंचलन धम्मपाल जाधव यांनी तर आभार डॉ सुनीता राठोड यांनी केले.
_
1 टिप्पण्या
Dhanyawad Mitra ✅✅ Badhiya
उत्तर द्याहटवा