ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशन तर्फे लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांना अभिवादन




चाळीसगांव: दि.०१ 
बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी झगडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती ओढरे येथे ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशन तर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
  फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक राठोड यांनी प्रतिमेचे पुजन करुन आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी अध्यक्ष अशोक राठोड हे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,” अण्णा भाऊ साठे भारताला लाभलेले मोठे रत्न आहे.त्यांनी आपल्या जीवन काळामध्ये अनेक कादंबऱ्या लिहिल्या त्यामध्ये “फकीरा” कादंबरीचा सामाविष्ट आहे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये समाज कार्य करत असताना,” ये आझादी झुठी है देश कि जनता भुकी है”ही घोषणा दिली होती.अण्णाभाऊंनी अनेक मोर्चामध्ये सहभाग घेतला समाजातील प्रत्येक घटकास न्याय मिळावा ही त्यांची इच्छा होती ह्या असामान्य व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे असे विचार राठोड यांनी व्यक्त केले.सदर जयंती कार्यक्रमा प्रसंगी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या भारती राठोड, ग्रामपंचायत सदस्य गजानन चव्हाण, विजय गायकवाड, रोहिदास राठोड, सोमनाथ पवार, राहुल राठोड, विजय पवार, दिनेश राठोड, वासुदेव पवार, चिंतामण पवार, गोरख पवार, सुनील राठोड, शिवानंद राठोड, दुर्गेश पवार, गणेश गायकवाड, अनिल राठोड व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या