विरार मध्ये आयसीआयसीआय बँक लुटीचा प्रयत्न
हल्ल्यात व्यावस्थपक महिलेचा मृत्यू, रोखपाल जखमी
पालघर प्रतिनिधी : हेमंत घाटाळ
वसई: विरार येथील आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थपकानेच बँक लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने केलेल्या चाकू हल्ल्यात बँकेच्या व्यवस्थापक महिलेचा मृत्यू झाला तर अन्य महिला जखमी झाली. हल्ल्यानंतर पळून जाणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली.
विरार पूर्वेच्या मनवेल पाडा येथे आयसीआयसीआय बँक आहे. गुरुवारी संध्याकाळी बँक बंद झाल्यावर सर्व कर्मचारी निघून गेले होते. त्यावेळी बँकेत रोखपाल श्वेता देवरूख (32) आणि व्यवस्थापंक योगिता वर्तक (34) या दोघीच होत्या. रात्री 8 च्या सुमारास बँकेचा माजी व्यवस्थापक अनिल दुबे बँकेत आला. त्याने चाकूचा धाक दाखवत बँकेतील रोख रक्कम आणि दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. या वेळी दोघींनी विरोध केला. दुबे याने दोघींवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात व्यवस्थापक योगीता वर्तक यांचा जागीच मृत्यू झाला तर रोखपाल श्वेता गंभीर जखमी झाल्या.
हल्ला करून पाळणाऱ्या आरोपी दुबे याला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.पुढील तपास पोलीस निरीक्षक करत आहेत.
1 टिप्पण्या
बँक व्यवस्थापन ने सुरक्षारक्षक नेमले नव्हते का ?एवढी मोठी बँक सुरक्षा रक्षक नाही ही तर आश्चर्याची बाब आहे
उत्तर द्याहटवा