चाकण परिसरातील कंपनी प्रतिनिधींशी पोलीस आयुक्तांचा संवाद

 चाकण परिसरातील कंपनी प्रतिनिधींशी पोलीस आयुक्तांचा  संवाद


प्रतिनिधी : योगेश ( विकास ) अल्हाट

चाकण :चाकण परिसरातील कंपन्यांच्या प्रतिनिधी सोबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी बैठक घेतली . महाळुंगे पोलीस चौकी आणि फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या बैठकीत कंपन्यांना भेडसावणाऱ्या समस्या  व उपाय योजना या विषयावर चर्चा करण्यात आली . बुधवारी ( दि.4 ) दुपारी खालुंब्रे येथे बैठक पार पडली .


बैठकीसाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार , या विभागाचे मुख्य अभियंता पाटील , वाघ, पिंपरी चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार

 बोर्ड फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे अध्यक्ष बटवाल साहेब व प्रतिनिधी उपस्थित होते .


 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोठा औद्योगिक पट्टा आहे . चिंचवड, भोसरी, चाकण परिसरात लहान मोठ्या हजारो कंपन्या आहेत . कंपनीमधील युनियन समस्या, कामगार समस्या, वाहतूक समस्या, चारित्र्य पडताळणी, सीसीटीव्ही व कंपन्यांमधील चोऱ्या इत्यादी विषयावर बैठकीत चर्चा झाली .


पोलीस आयुक्तांनी कंपनीच्या प्रतिनिधीशी थेट संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या काही मुद्यांवर तातडीचे निर्णय घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला . औद्योगिक परिसरात होणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सर्व कंपन्यांनी कंपनी समोरील रस्त्यावर, सुरक्षा भिंतीजवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आवाहन आयुक्तांनी यावेळी केले माथाडीचा विषयही या बैठकीत चर्चिला गेला .




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या