१४ ऑगस्ट 1942 ला शहिद झालेल्या पालघरच्या वीरपुत्रांना त्रिवार वंदन..
इंग्रजांविरोधातील चले जाव चळेवळीत सहभागी झालेल्या हौतात्म्य प्राप्त झालेल्या पालघर जिल्यातील पाच हुतात्म्यांना शनिवार दि .१४ ऑगस्ट श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिक ,शाळेतील विद्यार्थी उपस्थित राहत असून संपूर्ण पालघर शहरातील व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद ठेवले जातात . दि .७ ऑगस्ट १९४२ रोजी मुबईत भरलेल्या काँग्रेसच्या महाअधिवेशनात
इंग्रजांविरोधीतील चलेजाव चळवळीला सुरवात करण्यात आली .देशभरात 'करेंगे या मरेंगे ' ह्या निर्धाराने जिल्यातील देशबांधवानी मोठ्या संख्येने तिच्यात सहभागी झाले होते. मात्र पालघर मध्येहि १४ ऑगस्ट रोजी कचेरीवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते .त्या दरम्यान सहभागी होण्यासाठी तालुक्यातील सातपाटी ,शिरगाव ,धनसार ,अल्याळी ,खरंखुरं ,मुरबे ,नवापूर पामटेम्भी,पोफरणं ,आलेवाडी अनभाट ,आदी भागातून हजारो देशभक्त सहभागी झाले होते देशाला स्वातंत्र्यं मिळवून देण्याच्या उत्स्फूर्त प्रेरणेने भारावलेले हे तरूण स्वयंसेवक इंग्रजानी चालते व्हा! अशा घोषणा देत कचेरीच्या दिशेने हळूहळू कूच करीत होते .दरम्यान मोट्या प्रमाणात पोलीस
बंदोबस्त असल्याने वातावरण खूप तंग होते .अशावेळी इंग्रजांनी मोर्चा वर लाठीमार करायला सुरवात केली .त्यामुळे नांदगावच्या सेवादलाचे प्रमुख गोविंद गणेश ठाकूर ह्यांनी 'वंदे मातरम 'अशा घोषणा देत तिरंगा फडकवीत कचेरीवर चाल केली .ह्यावेळी मात्र इंग्रज अधिकाऱ्यांनी अल्मिडा यांनी मोर्चा अडविला मात्र मोर्चातिल तरुण घोषणाबाजी करीत राहिले एकही तरुण जागच्या जागी हलायला तयार नाही. उलट तो शांत मार्गने महसूस कचेरीकडे हळूहळू आगेकूच करत होते ईतक्या अल्मिडा यांनी मोर्चावर बेछुड़ जवळून केलेल्या गोळीबारात ह्या १७ वर्षीय देशभक्ताला हौतात्म्य प्राप्त झाले .ह्याच दरम्यान सातपाटीचे काशिनाथ भाई पागधरे ,पालघरचे राम प्रसाद तिवारी ,मुरंब्याचे रामचंद्र चुरी ,तर चाळवडचे सुकूर मोरे ह्या पाच देशभक्तांनी ही हौतात्म्य प्राप्त झाले .ह्यावेळी मरण पावलेल्या हातात तिरंगा ध्वज त्यांनी अखेर पर्वत खाली पडू दिला नाही. तो ध्वज आपल्या छातीवर झेलून ठेवला .रक्ताने माखलेल्या हा ध्वज आजही जतन करून ठेवला असून १४ ऑगस्ट १९४3 पासून हुतात्म्यांना स्मारक ते हुतात्मा स्तभा पर्यंत मूक मिरवणूक काढली जाते .शालेय
विध्यार्थाकडून देशभक्तीपर गीत गाऊन पाच वीरपुत्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते .
0 टिप्पण्या