प्रतिनिधी: योगेश ( विकास ) आल्हाट
चाकन , ता. खेड : अवैधरीत्या गुटखा विक्री केल्या प्रकरणी सामाजिक सुरक्षा पथकानी चाकण परिसरात रविवारी (दि.४ ) दोन ठिकाणे कारवाई केली .यामध्ये पोलीसांनी एक लाख सहा हजार रुपयांचा गुटखा जप्त केला . दोन्ही कारवायांमध्ये चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पहिली कारवाई वाकी खुर्द ता.खेड मधील जाधव वस्ती , गणेश नगर येथे करण्यात आली .
त्यामध्ये रामदास रोहिदास सहाणे( वय 24, रा. वाकी खुर्द ता. खेड ) ओमजी बिश्नोही ( वय ४० रा. खालुम्ब्रे ता.खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आरोपीने शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा घरात साठवून त्याची रिक्षातून वाहातूक केली . या प्रकरणी पालिसांनी कारवाई करत रिक्षा रोख रक्कम आणि ७२ हजार ९४४रुपयांचा गुटखा असा एकूण १ लाख ११ हजार ७७४ रुपयांचा ऐैवज जप्त केला.
दूसरी कारवाई चाकण ता. खेड येथील सत्यम पान स्टॉल या टपरी वर करण्यात आली. यामध्ये पोलिसांनी किसन मिठाराम बंजरा (वय ३२ , रा. माणिक चाळ चाकण ता. खेड ) कैलास बोरले पवार (वय ४०, रा. अंबेठान चौक चाकण ता. खेड ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आरोपींनी चाकण मधील विसावा हॉटेल च्या समोर असलेल्या सत्यम पान स्टॉल या टपरी मध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा साठवून ठेवला .
याबाबत ची माहिती मिळाल्या नंतर सामाजिक सुरक्षा विभागाने टपरी वर कारवाई करून ९ हजार १७० रुपये रोख रक्कम आणि ३४ हजार २१० रुपयांचा गुटखा असा एकूण ४३ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . वरील दोन्ही प्रकरणात चाकण पोलिस ठाण्या मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . दोन्ही गुन्हयांचा तपास चाकण पोलीस करीत आहेत .
0 टिप्पण्या