येरे येरे पावसा.... तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
गंगाखेड:- (ता. प्रतिनिधी) राम शिंदे
गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर आता येरे येरे पावसा म्हणण्याची वेळ आलेली आहे.
मागील दहा ते बारा दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. तालुक्यातील बहुतांश ठिकाणी एकंदरीत 60 ते 65 टक्के पेरणी झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने तुर, मुग, उडीद, सोयाबीन या पिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
पण अचानक पावसाच्या जाण्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरवर्षीप्रमाणे जून महिन्यामध्ये भरपूर पाऊस पडतो पण या वेळेस त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. तरीही शेतकऱ्यांनी मनावर दगड ठेवत कशीबशी पेरणी केली पण आता पेरले ते उगवते काय, आणि उगवते टिकते काय याची काळजी शेतकऱ्यांच्या मनामध्ये घर करून बसली आहे.
आता पाऊस जर नाही आला तर करायचं काय या विचाराने बळीराजा पुरेसा हतबल झाला आहे.
एकीकडे कारोना या महामारीमुळे पुरेसा हतबल झालेला शेतकरी, प्रचंड महाग असलेली रासायनिक खते बी-बियाणे यांची पुरेशी पेरणी करून बसलेला शेतकरी बळीराजा आता पुरेशा संकटात सापडलेला आहे. सरकारने यावर लक्ष केंद्रित करून मदतीची अपेक्षा शेतकरी वर्गाकडून होत आहे.
0 टिप्पण्या