मंडळ क्र 5 ,6 आणि 9 मधील कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण वर्ग कार्यक्रमात खासदार उन्मेश दादा पाटील यांचे मार्गदर्शन
----------------------
जळगाव -- केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून अनेक योजना राबविल्या आहेत. यांचा लाभ तळागाळात पोहचविण्यासाठी जनतेच्या संवादातून मन तयार करावी लागतील. भाजपचा कार्यकर्ता हा वयाने तरुण नाही तर मनाने तरूण असला पाहिजे. यासाठी हे प्रशिक्षण वर्ग असुन यापुढे साधनांनी नाही तर संवादातून जनतेची मन जिंकावी लागतील. यासाठी जनतेशी संवाद साधत कार्यकर्त्यांनी जनतेच्या मनात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी मेहनत घ्यावी. असे प्रतिपादन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले आहे. ते आज जळगाव शहरातील शारदाश्रम शाळेच्या सभागृहात आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सत्राचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर पाटील, सत्राचे संयोजक जिभाऊ वानखेडे उपस्थित होते. किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे,विधानसभा क्षेत्र प्रमुख दीपक साखरे, महानगर सचिव राहुल वाघ, भाजप मंडळ 5 अध्यक्ष शक्ती महाजन ,मंडळ 6 अध्यक्ष अजित राणे मंडळ 9 अध्यक्ष निलेश कुलकर्णी, नगरसेवक जितेंद्र मराठे, मयुर कापसे आदी नगरसेवक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन दिपक पाटील केले. यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते शारदाश्रम शाळेच्या आवारात वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी पक्षीमित्र राजेंद्र नन्नवरे यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या