रामानंद सागर यांची ९० च्या दशकातील प्रसिद्ध 'श्रीकृष्णा' या मालिकेचंही पुनर्प्रक्षेपण होणार आहे. लॉकडाऊनच्या काळात महाभारत, रामायण यांसाख्या मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुनर्प्रक्षेपीत करण्यात आल्या आहेत. यांना देशभरातील प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे.
मुंबई मिररच्या वृत्तानुसार उत्तर रामायण संपल्यानंतर दूरदर्शनवर 'श्रीकृष्णा' मालिका पुनर्प्रक्षेपित करण्यात येईल. मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध कलाकार स्वप्नील जोशी यानं या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती. त्यानंतर ही भूमिका सर्वदमन डी बॅनर्जी यांनी साकारली होती.
पहिल्यांदा १९९३ मध्ये 'श्रीकृष्णा' या मालिकेचे प्रसारण करण्यात आले होते. त्यानंतर १९९६ मध्ये ही मालिका पुर्नर्प्रक्षेपित करण्यात आली होती. लॉकडाऊनच्या काळात खासगी वाहिन्यांचे चित्रीकरण पूर्णपणे बंद आहे. अशावेळी जुन्या आणि लोकप्रिय मालिकांचे प्रसारण होत असल्यानं प्रेक्षक आता पुन्हा या मालिकांकडे वळत आहेत, त्यामुळे दूरदर्शनच्या टीआरपीमध्येही वाढ झाली आहे.
0 टिप्पण्या