कुपटा व विठोलीतील कोतवाल भरती आरक्षण सोडतीत सावळागोंधळ

 कुपटा व विठोलीतील कोतवाल भरती आरक्षण सोडतीत सावळागोंधळ 


मानोरा तालुका प्रतिनिधी -

मानोरा तालुक्यातील अकरा महसूल मंडळात कोतवाल पदासाठी  सरळसेवा भरती होत असून त्यापैकी कुपटा व विठोलीतील महसूल मंडळातील आरक्षणाची सोडत पुर्णतः चुकीच्या पद्धतीने काढण्यात आले आहे. सदर कुपटा महसूल मंडळात भटक्या जमाती ड ची लोकसंख्या नसूनही सदर ठिकाणचे आरक्षण भटक्या जमाती ड साठी आरक्षणात  सोडले गेले आहे तर विठोलीतील महसूल मंडळातील आरक्षणाची सोडत ई.डब्ल्यू. एस.प्रवर्गातील जातीसाठी आरक्षीत झाले आहे तिथे सुद्धा कुठलीही लोकसंख्येच्या बाबतीत विचार झालेला नाही. मानोरा तालुक्यातील सदर कोतवाल भरती चे आरक्षण नेते पुढारीच्या मनमानी नुसार झालेले असून सदर आरक्षण सोडत रद्द करण्यात यावी अशी मागणी गोरसेनेचे तालुकाध्यक्ष आशीष प्रल्हाद राठोड यांनी उपविभागीय अधिकारी कारंजा यांच्या कडे तक्रार करून केली आहे. सदर भरतीसाठी ३०जून रोजी परिक्षा होत असून तत्पुर्वी सदर आरक्षणात दुरुस्ती न केल्यास गोरसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गोरसेनेचे तालुकाध्यक्ष आशीष राठोड यांनी दिला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या