चैतन्य तांडा क्र. 4 येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

 

विश्व मानव रुहानी केंद्र चाळीसगाव तर्फे चैतन्य तांडा क्र. 4 येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न



विश्व मानव रोहानी केंद्र (नोंदणीकृत) ही सेवाभावी आणि आध्यात्मिक संस्था आहे. ही संस्था नैतिक जीवन, अध्यात्म आणि संत बलजीत सिंह जी यांनी शिकवलेल्या ध्यान पद्धती आणि लोककल्याणासाठी विविध सामाजिक कार्यांवर आधारित कार्यक्रम आयोजित करते. कोविड-19 महामारीच्या काळातही संस्थेतर्फे विविध राज्यांमध्ये पूर्ण ऊर्जा आणि उत्साहाने धर्मादाय कार्य केले जात होते.

या संदर्भात 18.06.2023 रोजी विश्व मानव रुहानी केंद्र शाखा चाळीसगावच्या वतीने चैतन्य तांडा क्र. 4, येथे मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 170 रुग्णांची अनुभवी डॉक्टरांकडून तपासणी करून त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत औषधे देण्यात आली. याप्रसंगी सरपंच दिनकर राठोड, गजानन चौधरी, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. व या सामाजिक कार्याचे त्यांनी कौतुक केले. या कामी डाॅ. जितेंद्र पाटील, डाॅ. राधा पाटील  यांनी आरोग्य निदान केले व  ऋतुजा चौधरी यांनी औषध वितरण केले.

       विश्व मानव रुहानी केंद्र अशा समाजसेवेच्या लोककल्याणकारी कामात प्रशासनाला सहकार्य करत राहील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या