रांजणगाव ग्रामपंचायती मार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त " अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराचे 2023 चे वितरण




महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करीत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे या करिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ..............

रांजणगाव ग्रामपंचायती मार्फत   पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त " अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराचे 2023 चे वितरण

 महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये आज एका छोटेखानी कार्यक्रमात रांजणगाव मध्ये उल्लेखनिय काम करणाऱ्या माता,भगिनींचा सन्मान यावेळी करण्यात आला.


सदरील कार्यक्रम ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच तथा विद्यमान जेष्ठ सदस्या सौ विद्यादेवी निंबा वाघ तसेच  विद्यमान सरपंच श्री प्रमोद वसंतराव चव्हाण उपसरपंच ताईसो विजया प्रमोद खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली ....


तसेच ग्रामसेवक श्री दिलीप नागरे  ग्रामपंचायत सदस्या सौ अंजली प्रदिप सोनवणे , शकीलाबी नजीरखा पठाण,  सदस्य श्री शालीक काशिनाथ मोरे यांच्या उपस्थितीत या तीनही महिला भगिनींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


यात प्रामुख्याने ....

1) सौ सुनीता श्यामकात सूर्यवंशी

......बचत गट(उमेद)

2) सौ रेखा अविनाश कुलकर्णी

 ........बचत गट (उमेद)

3) सौ संगीता अनिल पाटील

 .....आशा स्वयंसेविका 


या तीनही महिला भगिनींना  आज झालेल्या कार्यक्रमात  अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पूरस्काराने गौरविण्यात आले.


तसेच या कार्यक्रमाच्या प्रसंगी सरपंच श्री प्रमोद वसंतराव चव्हाण यांनी पुढील वर्षी रांजणगावमध्ये सर्वच विभागातून उल्लेखनिय, काम करणाऱ्या सर्वच माता भगिनींना ग्रामपंचायतीच्या वतीने पुण्यश्लोक अलिल्यादेवी होळकर होळकर पुरस्कार देण्याचे जाहीर केले.


या कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री प्रदीप भाऊ सोनवणे ,श्री अविनाश कुलकर्णी , श्री मकरंद नाईक ,श्याम साबळे यांचेसह गावातील महिला माता,भगिनी जेष्ठ श्रेष्ठ मंडळी यांचेसह तरुण मित्र मंडळी उपस्थित होती.


 सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतिचे कर्मचारी श्री गणेश देवरे क्लार्क तसेच श्री वाल्मिक सोनवणे शिपाई श्री कचरू गायकवाड पाणी पुरवठा कर्मचारी  तसेच कांतीलाल जाधव व प्रवीण जाधव यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या