चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत तपासणी सुरु केल्याने गुरे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले.....
CCTV चालू करण्याची मागणी...
.
चाळीसगाव ( सूर्यकांत कदम यांच्या सौजन्याने ) - चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव व उपसभापती यांनी मागील शनिवारी गुरांच्या बाजाराच्या दिवशी मुख्य गेटवर अचानक गुरे व वाहनांची तपासणी केल्याने कमी जनावरे दाखवून कमी पावत्या फाडणाऱ्या गुरे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले असून बंद असलेले CCTV चालू करण्याची मागणी होत आहे तसेच यापुढे देखील अशाच पद्धतीने कसून तपासणी केली जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक उलाढाल जवळपास सव्वादोनशे कोटीची असून त्यातून शेकडा एक टक्के नुसार वार्षिक उत्पन्न सव्वादोन कोटीचे आहे त्यात शेतमाल, भाजीपाला, गुरे, ढोरे आदींचा समावेश आहे त्यात महत्वाचे म्हणजे दर शनिवारी याठिकाणी गुरांचा बाजार मोठया प्रमाणात भरतो गुरे विक्री झाल्यावर बाहेर येताना प्रती बैल 100, म्हैस 200 तर शेळी मेंढी 50 रुपये अशी फी आकारली जाते मात्र काही व्यापारी हे सकाळी मार्केट मध्ये गेल्यावर 5 रुपयांची पावती फाडलेली असते व गुरे खरेदी विक्री झाल्यावर बाहेर निघताना गुरे विक्री झाली नाही व त्याच 5 रुपयाच्या पावतीवर बैल, म्हैस ही गुरे बाहेर घेऊन जात होते व आजही तो प्रकार थोड्याफार प्रमाणात सुरु असून मागील शनिवारी उपसभापती व सचिव यांनी मुख्य गेटवर स्वतः उभे राहून हा प्रकार थांबवला होता त्यामुळे अनेक फुकट जाणाऱ्या गुरे मालकाकडून पावत्या फाडल्या होत्या. त्यात काही शेतकऱ्यांची गुरे विक्री नाही होता त्यांना देखील भुर्दंड बसला होता मात्र जे व्यापारी खोटे बोलून गुरे बाहेर नेत होते त्यांना मात्र चपराक बसली बसली असून त्यांचे धाबे दणाणले आहे.
नूतन सभापती, उपसभापती, संचालक मंडळ व सचिव यांनी कर बुडवणाऱ्या व्यापाऱ्यांच्या गाड्यांची कडक तपासणी करावी व बंद असलेले CCTV चालू करण्याची मागणी होऊ लागली आहे.

0 टिप्पण्या