भारतीय जैन संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी वर्धमान धाडीवाल शहर अध्यक्षपदी मनोज छाजेेड
भारतीय जैन संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ आज चाळीसगाव येथील अरिहंत मंगल कार्यालय येथे संपन्न झाला असून यात जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी वर्धमान सुभाषचंद धाडीवाल यांची तर चाळीसगाव शहराध्यक्षपदी मनोज छाजेड उपाध्यक्ष निलेश शिवचंद्रजी ललवाणी सचिव धीरज स्वरूपचंद रुनवाल तसेच महिला शहराध्यक्ष म्हणून संगीता नैनसुख अलीझाड
उपाध्यक्ष माधुरी धीरज रुनवाल सचिव स्वाती शैलेश अंब्बड
यांच्या नावाची घोषणा खानदेश अध्यक्ष अशोकचंद श्रीश्रीमाळ यांनी केले असून पदग्रहण समारंभास महाराष्ट्र उपाध्यक्ष विनोदजी पारख, जिल्हाध्यक्ष सुमित मूनोत तसेच जैन समाजातील मान्यवर महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भारतीय जैन संघटनेच्या मार्फत भविष्यात रक्तदान शिबिरे नाला खोलीकरण आरोग्य शिबिर तसेच सामूहिक विवाह समारंभ अशा उपक्रमांचे आयोजन करून समाजाला उपयुक्त ठरण्याचे काम करण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुशल सोलंकी यांनी सुत्रसंचालन सोनम खाबीया यांनी केले तर आभार प्रदर्शन धिरज रुणवाल यांनी मानले

0 टिप्पण्या