रांजणगाव सरपंचपदी श्री प्रमोद वसंतराव चव्हाण यांची निवड

 रांजणगाव ता.चाळीसगाव ग्रामपंचायतिच्या सरपंचपदी श्री प्रमोद वसंतराव चव्हाण यांची निवड



रांजणगाव ग्रामपंचायतिच्या सरपंच सौ विद्यादेवी निंबा वाघ यांनी ठरलेल्या प्रमाणे  आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने  सरपंच पद रिक्त झाल्याने  आज रोजी तहसीलदार साहेबांच्या आदेशाने  ग्रामपंचाय


तिची निवडणूक घेण्यात आली .

या निवडणुकीत  सरपंच पदासाठी निर्धारित वेळेत श्री प्रमोद वसंतराव चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे  निवडणूक निर्णय अधिकारी श्री योगेश सोनवणे यांनी श्री प्रमोद वसंतराव  यांची निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित केले 

याप्रसंगी  माजी सरपंच सौ  विद्यादेवी वाघ तसेच  प्रभारी सरपंच तथा उपसरपंच सौ विजया खैरनार तसेच ग्रामपंचायतिचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते .सदरील कार्यक्रमाप्रसंगी  पॅनल प्रमुख  तसेच माजी सरपंच श्री जीभाऊ आधार पाटील ,श्री निंबा बाप्पू वाघ ,जेष्ठ कुस्तीपटू श्री युवराज वाघ , डॉ श्री मनोहर भामरे श्री सुरेशराव चव्हाण,श्री भाऊसाहेब चव्हाण ,श्री नानासाहेब चव्हाण ,श्री विनायक  चव्हाण ,श्री अनिल  पाटील , श्री दिलीप पाटील ,श्री संतोष सूर्यवंशी ,श्री भाऊसाहेब पाटील ,श्री अनिल सूर्यवंशी ,श्री बाप्पू पाटील ,रावण वाघ , श्री अनिल पाटील श्री प्रदीप सोनवणे  भिवराज पाटील, नजीर पठाण, विशाल मोरे ,दीपक वाघ  व गावातील नागरिक मोठ्या संख्येने या नवनिर्वाचित सरपंचांचे अभिनंदन करण्यासाठी उपस्थित होते 

या निवडणुकीसाठी ग्रामपंचायतिचे ग्रामविकास अधिकारी श्री दिलीप नागरे,तलाठी श्री दीपक गुरव ,कलर्क श्री गणेश देवरे, ऑपरेटर राहुल राठोड,शिपाई श्री वाल्मिक सोनवणे ,कर्मचारी श्री कचरू गायकवाड व कांतीलाल जाधव यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या