महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ वा वर्धापन दिन समारंभ निमंत्रण पत्रिका वर औरंगाबाद हेच नाव

 महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ वा वर्धापन दिन समारंभ निमंत्रण पत्रिका वर औरंगाबाद हेच नाव आहे



औरंगाबाद दिनांक ३० ( प्रतिनीधी ) 

काही दिवसा पूर्वी केन्द्र सरकार आणि राज्य सरकार ने एक परिपत्रक काढून औरंगाबाद चे नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्या मुळे मराठवाडा भर वातावरण गरम झाले होते. नामांतर प्रकरणा वरून वातावरण गरम करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याचे काम खुद राज्य सरकार कडून झाले होते. 

शहरातील काही लोकांनी उच्च न्यायालय मुंबई येथे औरंगाबाद नामांतर प्रकरनात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालय मध्ये सुनावणी घेण्यात आली आहे. पुढची तारीख जून मध्ये देन्यात आली आहे. औरंगाबाद नामांतर प्रकरण न्याय प्रविष्ट असून सुध्दा स्थानीक प्रशासन यांनी औरंगाबाद नावाचे फलक बदलून छत्रपती संभाजीनगर असे लावले होते. जिल्हाधिकारी कार्यालय चा फलक जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद आज ही असाच लावलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय यांना अधिकृत परिपत्रक किवा आदेश आलेले नाहीत. 

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ वा वर्धापन दिन समारंभ निमंत्रण पत्रिका वर औरंगाबाद छापलेले आहे. 

निमंत्रण पत्रिका मध्ये विनीत सुनील केंद्रेकर विभागीय आयुक्त औरंगाबाद . आणि  आस्तिक कुमार पाण्डेय जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी औरंगाबाद असे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या