मंगरूळपीर तालुक्यामधील गट ग्रामपंचायत उमरी बुद्रुक खापरी बुद्रुक येथील घरकुलांचा लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता व घरकुलाची चौकशी करण्याकरिता दिले मनसेने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन



दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी मनसे मंगरुळ तालुका अध्यक्ष लक्ष्मण जाधव व युवा सामाजिक कार्यकर्ते मनवीसे माजी तालुकाध्यक्ष जतीन सोनोने यांच्या नेतृत्वामध्ये मंगरूळपीर तालुक्यामधील  ग्रामपंचायत उमरी बुद्रुक खापरी बुद्रुक येथील घरकुलांचा लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता व घरकुलाची चौकशी करण्याकरिता दिले गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन  या निवेदनात अशी नमूद करण्यात आली की गट ग्रामपंचायत उमरी तालुका मंगरूळपीर जिल्हा वाशिम या गावामधील गेल्या पंचवीस वर्षापासून  शासनाची कोणतीही  योजना मिळाली नसून वारंवार सरपंच ग्रामसेवक सदस्य यांना विचारण्यात आले असता नेहमीच त्यांनी ग्रामस्थांना उडवा उडवी चे उत्तर दिले  त्यांना संपर्क किला की ते सांगतात आम्ही बाहेर गावी आहो तसेच ग्रामस्थांनी ग्रामसेवक कडे ८अ ची मागणी केली की ग्रामसेवक पैशाची मागणी करतात याच्या अगोदर आम्ही मंगरूळपीर तहसीलदारांना निवेदन सादर केले होते त्याच्यावर अद्यापही कोणतेही चौकशी करण्यात आली नाही आमच्या या निवेदनाला सविनयपूर्वक चौकशी करून गट ग्रामपंचायत मध्ये असलेल्या उमरी बुद्रुक  येथील सरपंच व ग्रामसेवक यांची ही चौकशी करण्यात यावी  व ग्रामस्थांना न्याय देण्यात यावे. या निवेदनावर कसल्याही प्रकारची चौकशी न झाल्या दिनांक 16 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व ग्रामस्थांतर्फे आमरण उपोषण करण्यात येईल करिता निवेदन  देण्यात आले. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष लक्ष्मण जाधव  युवा सामाजिक कार्यकर्ते मनविसे माजी तालुका अध्यक्ष जतिन सोनोने राहुल धूवारे सचिन कसार प्रमोद राऊत रवींद्र गादेकर गणेश शिंगारे बालाजी भुसारे अजय राऊत पुष्कर राठी आदि ग्रामस्थ  उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या