चाळीसगांव येथे जलदिन साजरा ,तालुका वकील संघ चाळीसगाव आणि पोदार इंटरनॅशनल स्कुल, चाळीसगाव यांचे संयुक्त विद्यमाने

चाळीसगांव :



जागतिक जल दिन

माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या निर्देशनाप्रमाणे दि.२१/०३/२०२३ रोजी 'जागतिक जल दिन' निमित्त शिबीर तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव व तालुका वकील संघ चाळीसगाव आणि पोदार इंटरनॅशनल स्कुल, चाळीसगाव यांचे संयुक्त विद्यमाने अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव तथा दिवाणी न्यायाधीश व.स्तर चाळीसगाव श्री.एन.के.वाळके यांचे अध्यक्षतेखाली शिबीर घेण्यात आले. सदर शिबीरात सौ. प्रमिला पाटील, शिक्षिका पोदार इंटरनॅशनल स्कुल, चाळीसगाव यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व सुत्रसंचालन केले. अॅड.श्री. हेमंत जाधव, सदस्य तालुका वकील संघ चाळीसगाव यांनी 'जागतिक जल दिन' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव तथा दिवाणी न्यायाधीश व.स्तर चाळीसगाव श्री.एन.के.वाळके यांनी आपले अध्यक्षीय भाषणात 'जागतिक जल दिन' निमित्त पाण्याचे महत्व, संरक्षण बचाव, प्रकिया, उपयोग व मानवाच्या जीवनाशी व निसर्गाशी त्याचा असलेला संबंध याबाबत मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. तसेच सदर कार्यक्रमास श्री.अजय घोरपडे, मुख्याध्यापक पोदार इंटरनॅशनल स्कुल, चाळीसगाव आणि इतर शिक्षकवर्ग कर्मचारी वृंद उपस्थित होते. तालुका विधीसेवा समिती तर्फे कार्यक्रमाचे आयोजन श्री.डी.के.पवार,व.लिपीक व श्री. के.डी.पाटील यांनी पाहिले. श्री.सचिन हाळवे, व्यवस्थापक अधिकारी, पोदार इंटरनॅशनल स्कुल चाळीसगाव चाळीसगाव यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केेले व कार्यक्रमाची सांगता केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या