ग्रामपंचायत सुकसाळेच्या ग्रामसभेमध्ये ग्रा मस्थांचे जुन्या रोजगार सेवक विजय गावित साठी बहुमत सिद्ध झाले.
त्याची चुकी नसुन तो निर्दोष आहे असे मत ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये सिध्द केले.
आज दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ रोजी ग्रामपंचायत सुकसाळेची ग्रामसभा नुकतीच पार पडली. त्यावेळी ग्रामसभेमध्ये बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते सदर ग्रामसभा सरपंच कुमारी अस्मिता सुरेश बुंधे यांच्या अध्यक्षते खाली पार पडली सदर ग्रामसभेच्या अजेंडेमध्ये दोन विषयाला अनुसरुन ग्रामसभा घेण्यात आली त्यावेळी ग्रामसभेच्या अजेंड्याप्रमाणे पहीला विषय ग्रामपंचायत सुकसाळे येथील ग्राम रोजगाराला कमी करणे असा विषय ठेवण्यात आला असता ग्रामसभेमध्ये रोजगार सेवकाची चुकी नाही म्हणुन ग्रामस्थांचा आक्रोश बघायला मिळाला व ग्रामस्थांनी हात वर करुन सदर रोजगार सेवक आम्हाला हाच पाहीजे म्हणुन बहुमत सिद्ध केले.
पत्रकार- अजय लहारे
0 टिप्पण्या