आदिवासी सांस्कृतिक महोत्सव पुणे येथील आदिवासी नृत्य स्पर्धा संपन्न.

 आदिवासी सांस्कृतिक महोत्सव पुणे येथील आदिवासी नृत्य स्पर्धा संपन्न.

        पालघर जिल्हा. राज्यस्तरीय महोत्सवात सोनाळे वाघाडी तीन वृत्त पथक राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव पुणे येथे संपन्न होत असलेल्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथे आदिवासी नृत्य स्पर्धायांचे आयोजन दिनांक 23 ते 27 मार्च दरम्यान केले .यावेळी डहाणू तालुक्यातील सोनाळे व वाघाडी येथील प्रसिद्ध तारपा नृत्य पथक व गौरी नृत्य  पथक सहभागी होऊन,येथील आदिवासी समाज सेवक विकास  वांगड यांच्या समवेत तारपा नृत्य पथक प्रमुख मोरेश्वर सातवी व बंधू कोल्हा गौरी पथक प्रमुख व 20 ते 22 जणांचे पथक सहभागी होऊन पारंपारिक परिधान वेषभूषा करून आदिवासींचे  नृत्य शैलीचे दर्शन घडवून समाजामध्ये आदिवासी नृत्य कलेचे महत्त्व पटवून दिले आहे. तसे ढोलकीच्या तालावर ती विशिष्ट तालबद्ध तारपा नृत्य, गौरी नृत्य असे अनेक विविध शैलीतून आदिवासी नृत्य त्याठिकाणी सादर झाले . मात्र वाघाडी सोनाळे नृत्य पारंपरिक पद्धतीने पारंपरिक वेशभूषेत परीक्षकांचे लक्ष वेधून.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या