चाळीसगाव तालुक्यातील खरजई येथे तरुणाचा चाकू भोसकून खून



चाळीसगांव :- गावातील मुलाला का मारले याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या इसमाला झालेल्या बाचाबाचीत एकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना काल रात्री नऊ वाजेच्या सुमारांस तालुक्यातील खरजई गावातील बेघर वस्तीत घडली आहे. या घटनेनंतर आरोपी लागलीच पसार झाला आहे.

या घटनेची माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपूर्वी खरजई गावातीलच प्रविण उर्फ मोन्या राजू सोनवणे (ह. मु. बायपासरोड चाळीसगांव) याने खरजई गावातील पिंन्टू शिंदे या तरुणास मारहाण केली होती. त्याला मारहाण का केली याची विचारणा सतिष साहेबराव सोनवणे (वय-32) रा. बेघरवस्ती खरजई) याने प्रविण उर्फ मोन्या सोनवणे याचेकडे काल रात्री केली असता या कारणावरुन सतिष आणि प्रविण उर्फ मोन्या यांच्यात बाचाबाची सुरु होती. या बाचाबाचीत प्रविण हा शिवीगाळ करीत असतांना सतिष याच्या पत्नीने तु शिवीगाळ का करतो अशी विचारणा प्रविणला करतांनाच प्रविणने तिच्या कानशिलात चापट मारल्याच्या कारणावरुन प्रविण आणि सतिष यांच्यात झटापट सुरु असतांनाच प्र्रविण याने खिशातील चाकु काढून सतिषच्या पोटात दोनतीन वेळा खोपसला. सतिष रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर प्रविण लागलीच तेथून पसार झाला. जखमी अवस्थेतील सतिषला चाळीसगांवी ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. या प्रकरणी मयत सतिषचा भाऊ संजय साहेबराव सोनवणे याचे तक्रारीवरुन शहर पोलीसांत रात्रीच गुन्हा र. नं. 117/2022 कलम 302, 323, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळाला भेटी दिल्या असून आरोपीच्या शोधासाठी सर्वत्र पथके तैनात करण्यात आली असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या