महामहिंद इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीच्या तक्षशिला विद्यालय (माध्य.) व ज्युनिअर कॉलेज - उल्हासनगर -04 मध्ये ' मिशन कवच कुंडल ' अंतर्गत मोफत लसीकरण संपन्न 


प्रतिनिधी - रामदास गाडर 


     

दि. 06/01/2022 रोजी  तक्षशिला विद्यालय ( माध्य.) व ज्युनिअर कॉलेज उल्हासनगर -4 मध्ये उल्हासनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे ' मिशन कवच कुंडल ' अंतर्गत 15 ते 18 वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्यांना मोफत लसीकरण करण्यात आले.

        शालेय लसीकरण  यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या शिक्षकांनी प्रत्यक्षपणे, समाजमाध्यमे आणि मोबाईलवरून विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांचे समुपदेशन केले.तसेच लसीकरणाचे महत्व पटवून देण्याबरोबरच त्यांच्या शंकांचे निरसन केले. या लसीकरण मोहिमेअंतर्गत  विद्यालयातील एकूण - 276 विद्यार्थ्यांना कोवॅक्सीनची लस वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली देण्यात आली. एकंदरीत लसीकरणास विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.

        महानगरपालिकेच्या लसीकरण टीमला महामहिंद इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीचे सहसचिव आयु.प्रशांतजी धांडे साहेब यांनी लसीकरण टीमचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.

         लसीकरण यशस्वी करण्यासाठी तक्षशिला विद्यालय ( माध्य.) व ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका आयु.सुनंदा गाडगे मॅडम यांच्या नियोजनानुसार  माध्य.विद्यालय व ज्यु कॉलेज सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच ' मॅजिक बस ' च्या सर्व स्टाफने विशेष परिश्रम घेतले.

      लसीकरण यशस्वी झाल्यानंतर म.म.इं.ध.सोसायटीचे पदाधिकारी,लसीकरण टीम,विद्यालयाचा सर्व स्टाफ,मॅजिक बस स्टाफ,पालक आणि विद्यार्थी यांचे  विद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करून विद्यालयातील लसीकरणाची सांगता झाली.