सीआरपी केडर्सचे थकीत मानधन दिवाळीपूर्वी मिळणार संघटनेच्या सततच्या पाठपुराव्याला यश

 उमेद सीआरपी व सखी संघटना,महाराष्ट्र राज्य


सीआरपी केडर्सचे थकीत मानधन दिवाळीपूर्वी मिळणार


संघटनेच्या सततच्या पाठपुराव्याला यश



          राज्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सुमारे पन्नास हजार सीआरपी केडर्स‌‌‌ असलेल्या महिला भगिणी गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. सदर केडर्समधील महिलांना सुमारे सहा महिने ते दोन वर्षे मानधन मिळालेले नाही. परिणामी दारिद्र्य रेषेखालील सीआरपी केडर्स महिलांची होणारी उपासमार थांबवावी आणि दरमहा मानधन अदा करावे. या मागण्यांसाठी संघटनेने सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता.

          आज दि.२६ ऑक्टोबर २०२१ रोजी *महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री मा. हसनजी मुश्रीफ* यांना त्यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी संघटनेच्या अध्यक्षा - मायाताई परमेश्वर यांनी भेट घेऊन, मानधन आणि अन्य प्रलंबित मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. 

          यावर सीआरपी केडर्सचे थकीत मानधन तात्काळ दिवाळी पूर्वी अदा करण्याबाबत  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हेमंत वसेकर IAS, यांना मंत्री महोदयांनी दूरध्वनीवरून सुचना केली. 

          त्यामुळे *सीआरपी केडर्सचे सुमारे दोन वर्षे थकीत मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.*  परिणामी संघटनेच्या सततच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. याप्रसंगी शिष्टमंडळात अध्यक्षा मायाताई परमेश्वर यांच्यासह संघटनेचे सरचिटणीस रामकृष्ण बी. पाटील आणि सुधीर परमेश्वर हे देखील उपस्थित होते.

        सीआरपी केडर्सने आपल्या हक्काच्या मागण्या सोडविण्यासाठी कोणत्याही दबावाला बळी न पडता संघटीत होऊन संघटना भक्कम करावी असे आवाहन *मायाताई परमेश्वर, रामकृष्ण बी.पाटील,  युवराज बैसाणे, सुधीर परमेश्वर, अमोल बैसाने, कुणाल थळे* यांनी केले आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या