शिक्षण आयुक्तांसोबत शिक्षक भारतीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
पेन्शन, बदलीसह विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा.
प्रतिनिधी : हेमंत घाटाळ
आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक भारती शिष्टमंडळाची आज (२० सप्टेंबर २०२१) मुंबईत शिक्षण आयुक्त यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. बैठकीत २००५ पूर्वी व नंतर सर्वांना जुनी पेन्शन, वस्तीशाळा शिक्षकांची मूळ नियुक्ती दिनांकापासूनची सेवा, प्राथमिक पदवीधर / विषय शिक्षकांना सरसकट ४३०० ग्रेड पे वेतन, आंतर जिल्हा आणि जिल्हा अंतर्गत बदली, वरिष्ठ व निवडश्रेणी, CMP आणि BDS प्रणाली, कोविड ड्युटी केलेल्या कर्मचारी यांना विशेष रजा, मृत कर्मचारी यांच्या कुटुंबियांना १० लाख सानुग्रह अनुदान यासह विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. आयुक्तांनी मुद्देनिहाय सर्व प्रश्न समजून घेत कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे.
शिष्टमंडळात शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड, माध्यमिकचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे, कार्यवाह प्रकाश शेळके, प्राथमिकचे सरचिटणीस भरत शेलार, नाशिकचे अध्यक्ष प्रकल्प पाटील, रायगडचे हरिश्चंद्र साळुंखे यांचा सहभाग होता.
0 टिप्पण्या