17 व्या नॅशनल जम्प रोप चॅम्पियनशीप -2021 स्पर्धेत ग्रामीण भागातील तरुणांचे सुवर्ण यश...

 17 व्या नॅशनल जम्प रोप चॅम्पियनशीप -2021 स्पर्धेत ग्रामीण भागातील तरुणांचे सुवर्ण यश...


 मोखाडा प्रतिनिधी - रामदास गाडर 

  राजस्थान येथे रविवार दि.19/09/2021पासून सुरु होणाऱ्या वरिष्ठ गटाच्या जंप रोप ह्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ  रवाना  झालेला होता. ही स्पर्धा 21 सप्टेंबर 2021 पर्यंत चालू राहिली होती. या स्पर्धेत 1500 पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत महाराष्ट्राकडून पालघर जिल्यातून  मोखाडा  तालुक्यातील कु.रमेश  काळू वाघ (वयोगट 18) कु.भावेश कृष्णा कोरडे (वयोगट 20) कु.योगेश सीताराम  भोगाडे (वयोगट 22) यांनी सहभागी होऊन महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत भावेश  कोरडे याने डबल गोल्ड मेडल, योगेश भोगाडे याने डबल गोल्ड मेडल तर रमेश वाघ याने सिल्वर मेडल मेडल पटकवून या क्रीडा क्षेत्रातील  प्रतिष्ठित समजल्या स्पर्धेत सुवर्ण यश मिळवले आहे.

        आदिवासी ग्रामीण भागातील मुलांमध्ये खेळासाठी लागणारी जिद्द,चिकाटी आणि अथक परिश्रम यांची अजिबात कमी नाही. मात्र त्यांना आवश्यकता आहे ती योग्य मार्गदर्शन आणि सोई- सुविधांची. या गोष्टींची पूर्तता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी प्रबळ इच्छाशक्तीने पूर्ण करून दिली तर आदिवासी ग्रामीण भागातील तरुण नक्कीच आपल्या मेहनतीच्या जोरावर विविध क्रीडा प्रकारांमध्ये संधीचं सोनं करतील यात शंका नाही.

        या तरुणांनी मिळवलेल्या घवघवीत यशामुळे महाराष्ट्रराज्य,पालघर जिल्हा व पर्यायाने मोखाडा तालुक्याची मान नक्कीच क्रीडा क्षेत्रात उंचावली आहे. त्यामुळे या तरुणांवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या