आळेफाटा येथे शेतकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन

 आळेफाटा येथे शेतकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन 


जुन्नर प्रतिनिधी : हरिश तायडे

आळेफाटा येथे पुणे नाशिक रेल्वे महामार्गास विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांचे मोठे रस्ता रोको आंदोलन 

पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यातील बाधित शेतकरी आळेफाटा येथे जमा होऊन सर्व शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करून पुणे नाशिक रेल्वे महामार्ग होऊ देणार नाही असे सर्व शेतकऱ्यांनी  सांगितले पुणे नाशिक रेल्वे महामार्ग होत असताना या मार्गात जात असणाऱ्या शेतजमिनी जिरायती आहेत असे सांगत या बागायती जमिनी वरून पुणे नाशिक महामार्ग बनवण्याचे काम केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे

जर या  महामार्गात आमच्या जमिनी गेल्या तर आम्ही भूमिहीन  होऊ असे येथील आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे आमच्याकडे उपजीविकेचे हेच एक साधन आहे जर आम्ही या शेत जमिनी सरकारला रेल्वे महामार्ग बनवण्याकरिता दिल्या तर आमच्या पुढील पिढी काय करणार हे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत शेतकरी त्यांच्या शेत जमिनी पुणे नाशिक रेल्वे महामार्ग बनवण्याकरिता देण्यास तयार नाहीत





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या