जव्हार येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात लोकन्यायालय चे यशस्वीरित्या आयोजन

 पालघर प्रतिनिधी: अजय लहारे



जव्हार येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात लोकन्यायालय चे यशस्वीरित्या आयोजन

:- माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार व माननीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली जव्हार येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय येथे रविवार, दि 1 ऑगस्ट 2021 रोजी लोक न्यायालय आयोजित करण्यात आले होते. सदर लोकन्यायालयात  दाखल व दाखलपूर्व अशी 109 प्रकरणे निकाली निघाली आहेत, तर एकूण 22 लाख 94 हजार 933 रुपयांची वसूली झाली आहे .

लोकन्यायालयात तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश श्री.संदीप खैरे यांच्या अध्यक्षतेखाली विविध प्रलंबित प्रकरणे निकाली निघाली आहेत. पॅनल पंच म्हणून अ‍ॅड.जयेश लोखंडे, 

अ‍ॅड.निशांत मुकणे,

अ‍ॅड.कल्याणी मुकणे,

अ‍ॅड.रणजित मेतकर, अ‍ॅड.अनिता फलटणकर, अ‍ॅड.अब्दुल मणियार, अ‍ॅड.भावना आहेर यांनी प्रकरणे सामोपचाराने मिटविणेसाठी सहकार्य केले. यावेळी लोकन्यायालयात आलेल्या प्रत्येक पक्षकाराने मास्क परिधान करून, सोशल डिस्टन्स ठेवून कोरोना च्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले होते. न्यायालयीन कर्मचारी श्री.भुपेश राऊत, सहायक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक श्री. मनोहर अडीवरेकर, श्रीमती.जयश्री दोंदे, श्री.राजेंद्र पंडित, स्टेनो श्री.कुलदीप जाधव, विधी सेवा समितीचे कनिष्ठ लिपिक श्री.प्रकाश राठोड, श्री.हंसराज सावळे, श्री.किरण मुळे, श्री.कैलास महाले, श्री.प्रियांक अहिरराव, श्री.प्रकाश बोर्डे, श्री.गणेश सागळे, श्रीम.वेणूबाई भोये, श्री.राहुल पाटील यांनी लोकन्यायालय यशस्वीतेसाठी विषेश परिश्रम घेतले आहेत.

       

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या