पालघर जिल्हयाधिकारी आदेश झुगारून धरणे ,धबधबे ,नद्या कडे पर्यटकांची धाव .
धरणात पोहायला गेलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने एका युवकाचा बुडून मृत्यू .
पालघर प्रतिनिधी : हेमंत घाटाळ
तन्मेष विकास तरे हा मित्रासोबत फिरायला गेलेल्या सतरा वर्षीय युवकाचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना सफाळे जवळीक रोडखड पाडा धरणात घडली असून तो पालघर जि .तील एडवणं येथील रहिवासी आहे . मिळालेल्या माहितीवरून दि.१.ऑगस्ट २०२१.रोजी सकाळी तन्मेष तरे हा त्याच्या सोबत मुला -मुलींचा मोठा ग्रुप होता .यातच काही जण धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेले .तन्मेष हा सुद्धा पोहायला गेला .यावेळी धरणात पोहत असताना त्याला पाण्याचा अंदाज आला नाही .त्यादरम्यान पाण्यात बुडायला लागला त्या वेळी मित्रांनी आरडा -ओरडा केल्यानी एकच खळबळ उडली धरणाजवळ काही लोकांनी धाव घेतली तन्मेष ला पाण्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना फारसे यश आले नाही .दरम्यान तन्मेष चा पाण्यात बुडून मृत्यू झाला .त्या परिसरात एकच शोककळा पसरली आहे .
दरम्यान हि घटना समजताच पोलीस घटनास्थळी धाव घेतली .त्यांनी तन्मेष चा शोध घेतला .त्यावेळी त्याचा मुत्यू देह बाहेर कढण्यात आला तन्मेष चा अचानक पणे मृत्यू झाल्यामुळे त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे .
मुसळधार पाउसामुळे पालघर जिह्यात धबधबे .धरणे .नद्या .ह्या पूर्ण भरल्या आहेत .त्यामुळे या ठिकाणी जाण्यासाठी मा.जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेश आहेत
तरी मात्र काही अतिउत्साही तरूण तरुणी या आदेशा कडे दुर्लक्ष करत असून धरण आणि धबधबे. नद्या कडे पर्यटकाचे जास्त वेध लागले आहेत.
0 टिप्पण्या