हॉर्स रायडर श्रीया पुरंदरेच्या आत्महत्येचे खरे कारण आले समोर
प्रतिनिधी : योगेश ( विकास ) अल्हाट
पुणेः नॅशनल हॉर्स रायडर असलेल्या श्रीया पुरंदरे (वय17 ) हिने पुण्याच्या नांदेड सिटीतील इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. रविवारी सकाळी हा प्रकार घडला होता. तिने आत्महत्या का केली याचे कारण समोर आले आहे. हवेली पोलीसांनी श्रीयाच्या कुटुंबीयाचा जबाब नोंदविला असुन त्यातुन ही माहीती समोर आली आहे.
श्रीयाच्या कुंटुंबीयाने पोलीसांना दिलेल्या माहीतीनुसार , मागील दोन ते तीन आठवड्यापासून श्रीया ऑनलाईन अभ्यासक्रमामुळे तणावात होती. त्यातुनच तिने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जातो . हवेली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
श्रीया उतम हॉर्स रायडर होती. लहानपणा पासुन ती हॉर्स रायडिंगचे धडे गिरवत होती. तिच्या नावावर रायडिंगमधील अनेक पुरस्कार आहेत. मात्र तिने अचानक आत्महत्या केल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नांदेड सिटी परिसरात श्रीया कुटुंबासमवेत राहत होती . रविवारी सकाळी नऊ वाजता तिने राहत्या इमारतीच्या 11व्या मजल्या वरून उडी मारली . जखमी अवस्थेत तिला
दवाखान्यात दाखल केले परंतु डॉक्टरांनी तिला अधिच मृत घोषीत केले.
श्रीया सध्या12 वी च्या वर्गात शिकत होती. दहावीला तिला तब्बल 97 टक्के मार्क्स पडले होते.
0 टिप्पण्या