तिसगाव ता. पाथर्डी जि. अहमदनगर येथे लोकशाहीरअण्णाभाऊ साठे यांची 101 वी जयंती उत्साहात साजरी.

 तिसगाव ता. पाथर्डी जि. अहमदनगर येथे  लोकशाहीरअण्णाभाऊ साठे यांची 101 वी जयंती 
 उत्साहात साजरी.


पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 101 वी जयंती  उत्साहात व करोणा चे सर्व नियम व निकष पाळून साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे  अध्यक्षपद काशिनाथ लवांडे पाटील (माजी सभापती पंचायत समिती पाथर्डी ) यांनी भूषविले .तसेच शिवशंकर राजळे,(माजी जिल्हा परिषद सदस्य ) ,अंकुश चितळे (शिवसेना तालुकाप्रमुख ), अभिजीत ससाने (जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी पक्ष ) , आकाश शेलार (तालुकाध्यक्ष युवक कांग्रेस ) , इलियास शेख (उपसरपंच तिसगाव ता .पाथर्डी ) या मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचे शोभा वाढवली.


कार्यक्रमात चैतन्य कानिफनाथ प्राथमिक आश्रम शाळा मढी ता. पाथर्डी या संस्थेचे व्यवस्थापक दीपक साळवे यांचा 'समाज भूषण ' पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी प्रतिक्रिया देताना दीपक साळवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. वेळोवेळी येणाऱ्या अडचणींवर मात करत कशाप्रकारे संस्था नावारूपाला आणली याबद्दल त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या . दीपक साळवे हे परिसरातील अनेक सामाजिक अडचणी सोडवण्यात अग्रेसर असतात. या कार्यामुळे त्यांना गौरवण्यात आले .कार्यक्रमात आयोजकांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीचे औचित्य साधून परिसरातील 101 गरजू कुटुंबांना धान्य व किराणाचे साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच करोणा काळात सहकार्य करणाऱ्या करोणा योद्ध्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांनी आपल्या भाषणातून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदिप ससाने यांनी केले तर उपस्थितांचे आभार अंबादास शिंदे यांनी मानले .सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाथरे मेजर , रॉयल शिंदे, दिलीप पाथरे , संजय वैरागर, आशिष लोंढे व इतर युवकांनी मोलाचे सहकार्य केले



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या