विक्रमगड मध्ये राज्यपाल अधिसूचित केलेली अनुसूचित जमाती संवर्ग मधील 17 सरळसेवा पद भरती करिता पालघर जिल्ह्यातील सर्व संघटना एकवटल्या.
स्थानिक आदिवासींना हक्काच्या नोकऱ्या न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचे एकमत झाले.
या वर्षीचा 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन होणार वेगळ्या पद्धतीने साजरा...
दि.१ ऑगस्ट,विक्रमगड-
आज विक्रमगड येथे पालघर जिल्ह्यातील सर्व आदिवासी संघटना,नोकरदार वर्ग,वकील,सामाजिक कार्यकर्ते,सुशिक्षित बेरोजगार राज्यपाल यांनी अधिसूचित केलेल्या अनुसूचित जमाती सरळसेवा भरती अंमलबजावणी,पेसा कायदा समर्थन, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी म्हणून ऐकवटले होते.
सदर बैठकीत सर्व सदस्यांनी आपाआपली मते व्यक्त करून यापुढे आपल्याला जशास तसे उत्तर द्यावे लागेल व आपल्या हक्काचे अधिकार मिळवून घेता येतील. आज पालघर जिल्ह्या वर्धापन दिन म्हणून राजकीय नेते साजरा करत असताना आजही आदिवासींच्या समस्या जैसे थेच आहेत. 2014 पासून पालघर जिल्हा वेगळा झाल्यापासून प्रशासनात कर्मचारी भरती झाली नाही.आजही आहेत त्या कर्मचारी वर्गावर अतिरिक्त ताण पडत असून त्याचा विपरीत परिणाम आदिवासींवर होत आहे.
पालघर जिल्हा हा अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित असताना तेथे काम करणारे कर्मचारी हे बाहेरील जिल्ह्यातील आहेत.त्यांना त्यांच्या जिल्ह्यात पाठविण्याकरिता फक्त शासनाने निर्णय केले खरे पण त्याची अंमलबजावणी मात्र झालीच नाही. अनुसूचित क्षेत्रात बिगर आदिवासी कर्मचारी यांची दरवर्षी 20% प्रमाणात बदल्या देऊन त्या ठिकाणी स्थानिक उमेदवार यांची भरती करण्यात यावी असे शासनाचे आदेश असताना ते कागदावरच आहेत.रिक्त जागा भरल्या जात नाहीत.त्यामुळे पालघर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार यांच्यावर मोठा अन्याय होत आहे.
पेसा कायदाच्या विरोधात काही समाजाची लोक वारंवार कुरघोड्या करताना दिसतात.आज आदिवासी समज जागृत झाला असून यापुढे असे झाल्यास जशास तसे उत्तर दिले जावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले.
9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन यावेळी वेगळ्या स्वरूपात साजरा करण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आला असून सर्व संघटनांनी आपल्या लेटरहेड वर राज्यपाल यांना जिल्हाधिकारी, तहसीलदार,प्रांत अधिकारी यांच्या मार्फत पाठविण्यात यावे.आपल्या अधिकारांची जनजागृती करण्याचे आव्हान देखील करण्यात आले आहे.
या बैठकीला पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधव राजकीय पक्षभेद,संघटनात्मक मतभेद विसरून मोठ्या संख्येने उपस्थित होता.यावेळी सर्व विसरून समाज म्हणून लढण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला .
9 आँगस्ट जागतिक आदिवासी दिन*
➖ निम्मिताने आयोजित ➖
*भव्य आदिवासी चिञकला स्पर्धा*
◼️ *कालावधी* -1 ते 8 आँगस्ट -2021
🥏 *आँनलाइन निकाल*- 9 आँगस्ट -2021
🏆 *पारितोषिक-🅰️ गट*- खुला / Open
*बक्षिसे*- 2001/- रु. 1001/- 700/-रु.
🅱️ *गट*- 14 वर्षाखालील वयोगट
*बक्षिसे* - 1001/- रु. 500/- 300/-रु.
📒📒 *विषय - आदिवासी सांस्कृतिक ,प्राकृतिक व ऐतिहासिक वारसास्थळे-*
1️⃣ *आदिवासी चिञ*- वारली चिञ , आदिवासी सांस्कृतिक चिञ, पारंपारिक सण-उत्सव चिञ व निसर्गचिञ
2️⃣ *ऐतिहासिक वारसा व श्रद्धास्थळे चिञ*- जव्हार संस्थान राजवाडा , हुतात्मा स्मारक - पेठ , साल्हेर किल्ला(बागलाण), हतगड किल्ला (सुरगाणा), देवमोगरा माता मंदिर(गुजरात),ञ्यंबकेश्वर मंदिर व सप्तशृंगीमाता गड (कळवण)
3️⃣ *निसर्ग पर्यटनस्थळे चिञ*- भिवतास धबधबा(सुरगाणा), तोरणमाळ (नंदुरबार ), बुरुंडी धबधबा (पेठ), दाभोसा धबधबा (जव्हार), अलालदरी फाँल(साक्री ), चणकापुर/अर्जुनसागर डँम(कळवण), भंडारदरा (अकोले-नगर)व ओझरखेड डँम( दिंडोरी )
4️⃣ *आदिवासी क्रांतिवीरांचे चिञ*- राणी दुर्गावती , बिरसा मुंडा, विर एकलव्य , राघोजी भांगरे , विरांगणा झलकारी व राणा पुंज्या भिल्ल
📕📕 *स्पर्धेचे नियम व अटी*➖
1)वरील विषयानुसार कोणतेही चिञ आपल्या कल्पनेनुसार आर्टवर्क पांढऱ्या कोऱ्या कागदावर काढता येईल.पेपर साईजची अट नाही.
2)चिञासाठी कोणतेही माध्यम वापरता येईल.उदा- जलरंग,अँक्रेलिक,रंगखडू,रंगीत पेन्सिल व स्केचपेन इत्यादी.
3)चिञ काढलेल्या कागदाच्या पाठीमागे तुमचे नाव,पत्ता,वर्ग-गट,स्पर्धा विषय, शिक्षण ,मोबाईल नंबर नमूद करावा.
4)आयोजक व परिक्षकांचा निर्णय अंतीम राहील.
5)चिञ जमा/पाठविण्यासाठीखालील नंबरवर संपर्क साधावा.
----------------------------------------------------
☎️चेतन खंबाईत(नाशिक)- 7517727575
गौरव चौधरी(पेठ)- 8806040084
प्रकाश ठाकरे(कळवण)- 9075825956
भावनाताई पवार(जव्हार)- 7776007628
मोहनदादा गुहे(पालघर)- 9637887241
आयोजक- संकल्प आदिवासी युवा जागृती संघटना-नाशिक,धुळे,नंदुरबार व पालघर*
0 टिप्पण्या