पुणे जिल्हयात कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या घालुन हत्या
प्रतिनिधी : योगेश ( विकास ) अल्हाट
मंचरः पुणे जिल्हयातील आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये भरदिवसा गोळ्या झाडून सराईत गुन्हेगाराचा खुन करण्यात आला. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली . ओंकार उर्फ राण्या बाणखेले असे खुन झालेल्या कुख्यात गुंडाचे नाव आहे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या तालुक्यात हा प्रकार घडल्यान संपुर्ण पुणे जिल्हयात एकच खळबळ उडाली आहे
मृत ओंकार उर्फ राण्या बाणखेले सराईत गुन्हेगार होता त्यामुळे पुर्ववैमनस्यातुन त्याचा खुन करण्यात आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे . आज दुपारी अगदी जवळून काही हल्लेखोरांने त्याच्यावर गोळ्या झाडल्या. बंदुकीची गोळी डोक्यात लागल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला.
घटनेची माहीती मिळताच मंचर पोलीस घटनास्थळी दाखल झाले . मृतदेह ताब्यात घेउन रुग्नालयात पाठवण्यात आला आहे . मंचर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे
0 टिप्पण्या