साखरे येथे ३०० गरजू कुटुंबांना अन्न- धान्याचे वाटप

 साखरे येथे ३०० गरजू कुटुंबांना अन्न- धान्याचे वाटप

प्रतिनिधी : रोहित गावित

कोरोनोच्या काळामध्ये अतिदुर्गम भागामध्ये भारत उत्थान संघ मुंबई यांच्या माध्यमातून तसेच श्री.गुंडोपंत माळी महाराज संस्थ साखरे यांच्य सहकार्याने आज सकाळी अकरा वाजता विठ्ठल मंदिर साखरे(हनुमाननगर) येथे सुमारे तीनशे लोकांना अन्न- धान्याचे किटचे मोफत वाटप करण्यात आले.या किटमध्ये तांदूळ, आटा,तेल,मीठ,मसाला,हळद अशा एकूण पंधरा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.भारत उत्थान संघाचे अध्यक्ष राकेश. के.सिंह व त्यांच्या सहकारी टीमचे ग्रामपंचायत सदस्य दिलीप भोये ,सखाराम भोये यांनी आभार मानले तसेच रघुनाथ भोये,प्रकाश खुरकुटे,तंटामुक्ती अध्यक्ष जानू भोये आदी मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली होती.

           भारत उत्थान संघ मुंबई यांच्या माध्यमातून पूर्वीसुद्धा चपल,कांबळे व आरोग्याविषयी विविध प्रकारचे शिबिर आयोजित करण्यात आले होते असे मोलाचे मार्गदर्शन या संघाकडून साखरे( हनुमाननगर) वाशियांना करण्यात येते.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या