जव्हार तालुक्यातील किरमिरा ते दाभलोन रस्ता उखळलला. . . . जणु बांधकाम विभागाची ठेकेदारांवर क्रूपा. .
प्रतिनिधी : अजय लहारे
दिनांक:-२७ जुन २०२१
जव्हार तालुक्यातील किरमिरा ते दाभलोन येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधुन रा.मा. ७२ ते दाभलोन असा बनवलेल्या रस्त्याला अवघ्या पावसाळ्यातच जागो-जागी खड्डे पडुन उखळला गेलेला आहे. सदर रस्त्यांचे काम महाराष्ट्र ग्रामिण रस्ते विकास संस्था पालघर मार्फत करण्यात आलेले आहे.एखाद्या रस्त्याला एक वर्षसुध्दा पुर्ण होत नाही आणि तो रस्ता उखळला जातो तर बांधकाम विभाग ठेकेदारांकडुन चांगले काम करवुन घेते की ठेकेदारांना पाठीशी घालुन निक्रूष्ट दर्जाची कामे करुन सुध्दा, जणु ठेकेदारांवर क्रूपा तर करत नाही ना? असा प्रश्न पडल्यास तो चुकीचा मानता येणार नाही.नक्की आपल्या ग्रामिण विभागाचा अश्या निक्रूष्ट कामामुळे विकास होईल की मुख्यमंत्री ग्रामसडक योजना फक्त ठेकेदारांचे खिस भरण्यासाठीच आहे ही मोठी शोकांतिका आहे.
किरमिरा ते दाभलोनपर्यंत बनवलेला रस्ता निक्रूष्ट दर्जाचा बनवलेला आहे,हा रस्ता निक्रूष्ट दर्जाचा असल्यामुळे अवघ्या चार-पाच दिवसातच रस्त्यांवर वाहने जाताच खड्डे पडुन उखळला गेलेला आहे. तरी संबंधित कामाची चौकशी करुन आम्हा ग्रामस्थांना रस्ता पुन्हा चांगला रस्ता बनवुन द्यावा व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी दाभलोन ग्रामस्थांनी केली आहे.
सा. वंचित गावकरी प्रतिनिधी-अजय लहारे (7620855784)
1 टिप्पण्या
रस्ता निकृष्ट दर्जाचा आहे सदर रस्त्याचे डांबरीकरण नवीन केल्यास ग्रामस्थांना न्याय मिळेल?
उत्तर द्याहटवा