विक्रमगड मध्ये बीजप्रक्रिया व पिक प्रात्यक्षिक कार्यक्रम
तालुका-विक्रमगड.
राष्ट्रीय केमिकल्स एंड फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनी च्या वतीने पिक प्रात्यक्षिक व बिजप्रक्रिया कार्यक्रम शिम्पिपाडा, तालुका- विक्रमगड, जि. पालघर येथे श्री. कुलदीप दिनकर पाटिल यांच्या शेतात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात निवडलेल्या शेतकरी ने NPK बायोला ची बिजप्रक्रिया चे प्रात्यक्षिक करुन दाखवले व सोबत NPK बायोला या जीवाणु संवर्धकाचे महत्व सांगितले.
श्री. पवन आंभोरे जिल्हा प्रभारी ठाणे यांनी माती परीक्षण व RCF च्या मूल्यवर्धित उत्पादनाबद्दल मार्गदर्शन केल. श्री. विलास पाटिल कोकण विभाग प्रमुख यांनी RCF च्या उपक्रमाबद्दल सखोल माहीती दिली. श्री. एस. डी. गोवेकर जिल्हा प्रभारी, पालघर यांनी बिजप्रक्रिये स्पर्धेबाबत सखोल माहीती दिली, तसेच श्री. सुरज वळवी कृषी पदविधर यांनी १५९ माती परिक्षाणाचे नमूने शेतकऱ्यांना वाटप केले.
या कार्यक्रमास जवळपास ३५ शेतकरयांचा सहभाग होता, तसेच गावातील सरपंच व ग्रामसेवक, अधिकृत खाद विक्रेते, किरकोळ विक्रेते यांनी या कर्यक्रमास सहभाग घेतला.
विक्रमगड प्रतिनिधी-अजय लहारे,वंचित गावकरी साप्ताहीक व्रूत पत्र (7620855784 )
0 टिप्पण्या