मा संजयजी राठोड आमदार (दिग्रस) यांचा जनसंपर्क दौरा

 माजी कॅबिनेट मंत्री आमदार संजयभाऊ राठोड यांचा परभणी व जालना जिल्ह्यात जनसंपर्क दौरा


विदर्भातील राजकीय क्षेत्रातील खंबीर नेतृत्व, तरुण,तडफदार माजी कॅबिनेट मंत्री,यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे लाडके, लोकप्रिय शिवसेना आमदार,विकासाचा महामेरु संजयभाऊ राठोड यांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी श्री चंद्रकांत काळुराम पवार चित्रपट निर्माता,दिग्दर्शक व सामाजिक कार्यकर्ता यांना सोबत घेऊन दिनांक 6 एप्रिल 2021 रोजी महाराष्ट्र जनसंपर्क दौऱ्यास वसई,जिल्हा पालघर येथून सुरुवात केली.त्यानंतर दिनांक 12 एप्रिल रोजी मुंबई जिल्हयातील दहिसर,मिरारोड,भाईंदर,गोराई,चारकोप,कांदिवली येथील जनतेस सदिच्छा भेट दिली.या दौऱ्यास सर्व जनतेकडून तसेच कार्यकर्त्यांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला.लॉकडाऊनमुळे स्थगित केलेल्या यापुढील दौऱ्याची सुरुवात परभणी व जालना जिल्हा येथून होणार आहे.या जनसंपर्क दौऱ्याच्या दरम्यान संजयभाऊ राठोड हे काही खेडेगाव व तांडा वस्तीतील जनतेला प्रत्यक्ष भेटून कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या समस्या व इतर समस्या जाणून घेणार आहेत.त्यानंतर पहिल्या दिवशी परभणी व दुसऱ्या दिवशी जालना येथील शासकीय विश्रामगृह येथे विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांसोबत क्रिमिलेयर-नॉन क्रिमिलेयर,आरक्षण,सामाजिक व राजकीय तसेच इतर विविध विषयांवर चर्चा करणार आहेत.

                : जनसंपर्क दौरा :

रविवार दिनांक 20 जून, 2021 दुपारी 01.00 वाजता

शासकीय विश्रामगृह,परभणी.

सोमवार दिनांक 21 जून, 2021 दुपारी 12.30 वाजता 

शासकीय विश्रामगृह, जालना.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. चाळीसगांव तालुक्यात जवळपास ५२ तांडे आहेत इकडे पण दौरा काढा व कर्मचारी पदोन्नती साठी प्रयत्न करा सरकार आपले आहे, कर्मचाऱ्यांना जरूर न्याय मिळेल फक्त आपण मदत केली तर जय सेवालाल 🙏🙏

    उत्तर द्याहटवा