वार्ड क्र.९ हिरापूर रोड मधील परशुराम नगर,रुद्र हनुमान
नगर,इच्छादेवी नगर भागात मागील १ महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे न.पा.कर्मचारी हा परिसरातील लाईट गेल्या नंतरच पाणी सोडतात त्यात कमी वेळ पाणी सोडल्यामुळे पुरेसे पाणी साठवण करता येत नाही
अगोदरच ५ व्या दिवशी पाणी येत असल्याने नागरिकांचे पाणी हे अगोदरच संपलेले असते न.पा. कर्मचारी यांना फोन केला तर वरिष्ठांना सांगा आमच्या हातात काही नाही, पण त्यांना हे मात्र कळत नाही की, लाईट ज्या भागातील गेली आहे त्या भागाच्या व्हाल बंद करून नंतर पाणी सोडता येत.
संपूर्ण परिसरातील रहिवाशी पुरेसे पाणी येत नसल्यामुळे संतप्त झाले आहे. २ तास पाणी सोडता तर ३ ऱ्या दिवशी पाणी सोडा..५ व्या दिवशी पाणी सोडता तर ३ तास पाणी सोडा. त्यात कर्मचाऱ्यांनी लाईट गेल्यावर पाणी सोडू नये कारण पाणी हे एका घरचे नसून पूर्ण कॉलोनीतील रहिवाश्यांना आहे त्या मुळे लाईट आहे की नाही हे कळायला वेळ लागत नाही.
असेच चालू राहिले तर नगरपालिकेवर वार्डातील त्रस्त राहिवाश्यांना सोबत घेऊन प्रविण मराठे हे मोर्चा काढणार त्यास प्रशासनच जबाबदार राहणार.
1 टिप्पण्या
आमच्या कडे काँलणीत पाणी आल्यावर अर्ध्या तासाने उशिरा पाणी येते आणि सर्वान सोबत पाणी पुरवठा बंद होतो
उत्तर द्याहटवा