जीवन गौरव पुरस्काराने जगदीश देवपूरकर सन्मानित, सचिन गोस्वामी यांना खान्देश कलारत्न
दिनांक ६ जून २०२१ रविवार रोजी उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचलीत ,जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे कान्हदेश कलावंत गौरव सोहळाआयोजित करण्यात आला होता सोहळ्यास खान्देशातील धुळे ते मुंबई कलापंढरी पर्यंत प्रवास केलेले सन्माननीय सचिनजी गोस्वामी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ.विजयराव सूर्यवंशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाने अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे पहिल्यांदाच अहिराणी भाषिक कलावंतांचा व्हर्च्युअल सन्मान सोहळा आयोजित केला होता .
अहिराणीभाषा जवळजवळ दोन कोटी लोकांची मायबोली आहे .परंतु तिला प्रमाणभाषेचा दर्जा नसल्यामुळे अहिराणी भाषा बोलणं हे काही मंडळी कमीपणाचे समजतात .तरीसुद्धा जात्यावरच्या ओव्या म्हणणाऱ्या अनेक माया भगिनींनी अनेक गोष्ट सांगणारे (गोटाळे), तमाशा कलावंत ,शाहीर ,दिग्दर्शक सुत्रसंचालक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ही भाषा ही संस्कृती जपण्याचा मनःपूर्वक प्रयत्न केला .प्रसंगी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून अहिराणी मायची सेवा केली .या सर्व कलावंतांचा सत्कार जागतिक अहिराणी भाषा परिषदे तर्फे करण्यात यावा असा मानस संघटनेचे कार्याध्यक्ष सन्माननीय श्री बापूसाहेब पिंगळे यांनी ठेवला याला सर्व मान्यवरांनी मनापासून अनुमोदन दिले व पुरस्कार सोहळा रंगतदार बनवला .पुरस्कार सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील पोवाडा शाहीर शिवाजीराव पाटील यांनी सादर केला तर ओ तुनी माय या चित्रपटातील कानबाई वरील गीत सादर करण्यात आला तसेच मा.सचिन गोस्वामी आदरणीय जगदीश देवपूरकर यांच्या जीवनावरील जीवनपट सादर करण्यात आला.बापूसाहेब पिंगळे व सौ. पुनमताई बेडसे यांनी आपल्या खुमासदार शैलीत सूत्रसंचालन करून सोहळ्याची रंगसंगती वाढवली .सचिनजिंनी सर्व कलावंतांसाठी सदैव सहभाग घेऊन कार्य करेल असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले तर जगदीश देवपूरकर यांनी सर्व कलावंतांचा हा परीक्षेचा काळ आहे त्यांना या काळात मदत करणे ही गरजेचे आहे यासाठी आपण सर्वाजण सर्वतोपरी प्रयत्न करू असे सांगितले .बापूसाहेब पिंगळे यांनी आपण लवकरच अहिराणी अकॅडमी साठी प्रयत्न करू आणि सर्व कलावंतांना प्रशिक्षण देता येईल का या बाबतीतही आपण लवकरच निर्णय घेऊ उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी सर्व कलावंतांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली आम्ही खरोखर खूप भाग्यवान आहोत. देवा आमच्या हातून अशीच सेवा घडत राहो अशी प्रार्थना केली .सचिनजी गोस्वामी यांना कान्हदेश कलारत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. तर माननीय श्री जगदीशजी देवपूरकर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच कलाक्षेत्रातील क्षेत्रातील १३ मान्यवर कलावंतास कान्हदेश कलाभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले तसेच ३७ कलावतांना कान्हदेश कलायात्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी श्री.अशोक चौधरी व डॉ।अरुण अहिराव श्री.श्यामदादा राजपूत या सर्व कलावंतांनी उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ व जागतिक आहीराणी परिषदेचे मनापासून आभार मानले या कार्यक्रमाचे खरे आकर्षण ठरले ते श्याम दादा राजपूत मराठी हास्य जत्रा कलाकार व सचिनजी गोस्वामी डॉ. विजयराव सुर्यवंशी व आदरणीय नानासाहेब श्री प्रतापरावजी दिघावकर साहेब सर्व मंडळींनी खान्देशच्या अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करावा असे आव्हान मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी केले.श्री. एम के भामरे बापू यांनी जगदीश देवपूरकर यांच्या पुरस्काराचे वाचन केले श्री. एन।एम.भामरे यांनी सचिनजी गोस्वामी यांच्या पुरस्काराचे वाचन केले डॉ.विजयराव सूर्यवंशी यांनी सर्व कलावंतांचे अभिनंदन करून कलायात्री पुरस्कार घोषित केले तर सचिनजी गोस्वामी यांनी सुद्धा कलाभूषण पुरस्कार घोषित करून त्यांचे अभिनंदन केले डॉ.विजयराव सूर्यवंशी यांनी खान्देश.साठी सर्वतोपरी प्रयत्न करीन असे सांगितले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मनोरंजक पणे प्रा.प्रकाश माळी यांनी केले कार्यक्रमासाठी सर्व तांत्रिक बाबी मा.श्री विनोद भानुशाली यांनी खूप मोलाचं सहकार्य केले तसेच श्री प्रमोद कुवर ए.जी .आप्पा बापूसाहेब हटकर निवड समिती आप्पासाहेब विश्राम बिरारी ,प्रकाश पाटील पिंगळवाडेकर ,भटूदादा चौधरी ,वनमाला बागुल ,विनोद ढगे ,शेषराव नाना गोपाळ या सर्वांनी मोलाचे सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला.
पुरस्कारार्थी
जीवनगौरव
मा.श्री.जगदीश देवपूरकर
खान्देश कलारत्न
मा. श्री.सचिनजी गोस्वामी.
कान्हदेश कलायात्री पुरस्कार
१. श्री.विजय जगताप
२. श्री.शिवाजी शेवाळे
३.श्री.नरेंद्र कोळी
४. श्री.संजय चंदणे
५.श्रीमती मीना रणदिवे
६.श्री हेमंत चौधरी
७.श्री मयूर तायडे
८. श्री.सचिन कुमावत
९.श्री.आबा चौधरी
१०. श्री.मगन गुरव
११.श्री.संतोष ईशी
१२. श्री.मुकुंदा गुरव
१३.श्री.मयुर गुरव
१४.श्री।भगवान महाजन
१५.श्री।श्रावण वाणी
१६.श्री.विठोबा चौधरी
१७. श्री.प्रशांत महाजन
१८. श्री.शब्बीर सरदार
१९.श्री।भाविक बिरारी
२०.श्री.किरण ढोले
२१.श्री.विलास मोरे
२२.श्री।नारायण पाटील
२३. श्री।जगदिश संदांशिव
2४. श्री.विनोद कुमावत
२५.श्री.नागसेन पेंढारकर
२६ श्री.प्रवीण माळी
२७.डॉ. माधव कदम
२८.डॉ. सचिन पाटील
२९.प्रा. विजय पाटील
३०.प्रा.प्रकाश माळी
३१.प्रा.विनोद शिंदे
३२. श्री.ठाणसींग पाटील
३३.श्री.मनोहर खैरनार
३४. श्री.सुरेश अंतुर्लीकर
३५.श्री.एकनाथ गोफणे
३६ डॉ. अरूण अहिराव
३७.श्री राम खंडेलवाल
३८. सौ.चेतना भालेराव
........................................
कान्हदेश कलाभूषण पुरस्कार
१.अभीनय- श्रीमती विद्या भाटिया
२.गायन-श्रीमती ऋचा बिरारी
३.नृत्य- श्री.जितू नगराळे
४.लोकसंगीत- श्री.अशोक बनारसे
५.तमाशा - श्रीमती सुनंदा कोचूरे
६.वाद्य-श्री. विरेंद्र सैंदाणे
७.शाहीर- श्री.शिवाजीराव पाटील
८.सिनेकलावंत -श्री.विजय पवार
९.उत्कृष्ट निर्माता- श्री.साजीदभाई अन्सारी
१०.दूरदर्शन मालिका- श्री.शाम राजपूत
११.नाट्य कला- डॉ. एस.के.पाटील
१२.अहिरानी गितकार-श्री. अशोक चौधरी
१३ सिनेकला -श्री. ईश्वर माळी..
1 टिप्पण्या
अतिशय सुंदर कार्यक्रम झाला अभिनंदन
उत्तर द्याहटवा