एक नजर कोरोनावर

 ●महाराष्ट्र कोरोना●

★शनिवार २२ मे २०२१★



🟩 राज्यातील कोरोना रुग्णवाढीचा आलेख उतरणीला

🟩 राज्याचा रिकव्हरी रेट वाढला

🟩 मृतांच्या संख्येतही घट

🟩 राज्यात २६ हजार १३३ नवीन रुग्ण

🟩 एकूण रुग्णसंख्या ५५ लाख ५३ हजार २२५

🟩 आज ४० हजार २९४ रुग्ण बरे झाले

🟩 आतापर्यंत ५१ लाख ११ हजार ०९५ जण बरे झाले

🟩 दिवसभरात ६२८ मृत्यू

🟩 एकूण मृत्यूसंख्या ८७ हजार ३००


🟩 रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.०४ टक्के

🟩 मृत्यू प्रमाण ०१.५८ टक्के

🟩 सध्या ३ लाख ५२ हजार २४७ रुग्णांवर उपचार सुरू




★वंचित गावकरी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र★


आज राज्यात २६ हजार १३३ नवीन रुग्णांचे निदान झालं आहे. तर ६८२ कोरोना बाधित रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा आलेख उतरणीला लागला आहे. दिवसागणित ५० ते ७० हजारांपर्यंत पोहोचलेली रुग्णसंख्या आता ३० हजारांपर्यंत खाली आली आहे. मृतांच्या संख्येतही घट पाहायला मिळत आहे. कठोर निर्बंध, लसीकरणाचा वेग आणि आरोग्य यंत्रणेचे कठोर प्रयत्न यामुळं रुग्णसंख्येत सुधार आल्याचं चित्र आहे. तसंच, राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर सुद्धा वाढल्यानं आरोग्य प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.


आज राज्यात ४० हजार २९४ रुग्णांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. तर राज्यात आजपर्यंत एकूण ५१ लाख ११ हजार ०९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.०४ टक्के इतके झाले आहे. दिवसभरात २६ हजार १३३ नवीन रुग्णांचे निदान झालं आहे. आज दिवसभरात ६२८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं राज्यातील एकूण मृतांची संख्या ८७ हजार ३०० इतकी झाली आहे. मृत्यूदर १.५८ टक्के इतका आहे. 


राज्यात सध्या ३ लाख ५२ हजार २४७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,२७,२३,३६१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५५,५३,२२५(१६.९७टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २७,५५,७२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २२,१०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या