रेशन दुकानदारांकडून होणारा धान्याचा काळाबाजार त्वरित थांबवावा
भाजयुमो चे तहसीलदारांना निवेदन
आज दि. 24 मे 2021 सोमवार रोजी तालुक्यातील काही रेशन दुकानदारांकडून धान्याचा काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने धान्याचा होणारा काळाबाजार थांबावा म्हणून भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे निवेदन देण्यात आले. शासकीय नियमानुसार रेशन दुकानदारांना दुकानाच्या बाहेर दर्शनी भागात माहिती फलक, शिल्लक मालाचा तपशील, धान्य दिलेल्या लोकांची यादी लावणे, रेट बोर्ड लावणे अनिवार्य असतांना काही दुकानदारांकडून या नियमांचे पालन होत नाही. त्याचप्रमाणे नागरिकांना मिळणाऱ्या धान्यात गहू कमी करून त्या ऐवजी मका देत आहेत. सदर धान्याची कुठल्याही प्रकारची पावती सादर रेशन दुकानदार देत नाहीत. अशी तक्रार यावेळी निवेदनाद्वारे भाजयुमो शहराध्यक्ष भावेश कोठावदे यांनी दिली असून आपल्या स्तरावर रेशन दुकानदारांना सूचना द्याव्यात अशी विनंती केली आहे. यावेळी शहर उपाध्यक्ष राहुल पाटील, सरचिटणीस तुषार बोतरे, प्रा. सचिन दायमा, दिपक वाघ हे उपस्थित होते.
1 टिप्पण्या
बरोबर सदरहू चौकशी झाली पाहिजे
उत्तर द्याहटवा