श्री क्षेत्र देहूगाव मध्ये नागरी वस्तीमध्ये बेकायदेशीर, विनापरवाना कारखाने सुरू करून मानवी आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
श्री क्षेत्र देहूगाव :
संत तुकाराम सोसायटी मधील समस्त नागरिक. वडाचामाळ, गट क्र. ३९/२ श्री क्षेत्र देहूगाव या ठिकाणी गेली ९ वर्ष आम्ही ७५० ते ८०० लोक राहत असून अलीकडच्या काळात हे गाव तिर्थ क्षेत्र असून देखील सोसायटीच्या बाजूला बेकायदेशीर, विनापरवाना कारखाना उभारला आहे.
गिरीष दांडे यांचा (गट क्रमांक ३९/१) गणेश हगवणे यांच्या जागेत सोसायटीच्या बाजूंने कारखाना आहे.
या कारखान्या पासून येथील सर्व नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. वायू प्रदूषण तसेच ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्या कारणाने श्वसनाचे त्रास जाणवत आहेत. दारे खिडक्या बंद करून घरात बसाव लागत आहे. घरातून बाहेर निघणे अवघड झाले आहे. रात्री १० ते ११ वाजेपर्यंत काम चालू असते. ध्वनी प्रदूषणामुळे जेष्ठ नागरिक आणि लहान मुलांना त्रास होत आहे आणि शाळकरी मुलांना अभ्यासात मोठ्या प्रमाणात व्यत्यय निर्माण होत आहे. याच भागात हाकेच्या अंतरावर शाळा देखील आहे.
तसेच केमिकल युक्त पेंट आणि धुळ मोठ्या प्रमाणात या परिसरात असते.
येत्या काळात श्वसनाचे गंभीर आजार येथील नागरिकांना जडतील.
या भागात चालणारा कारखाना लवकरात लवकर बंद झाला पाहिजेत अशी तीव्रतेची मागणी नागरिक करत आहोत.
जानेवारी महिण्यात काही ठीकाणी तक्रार अर्ज देऊन देखील स्थानिक प्रशासनाच्या वतीने काहीच दखल घेतली जात नाही.
श्री क्षेत्र देहूगाव हे तिर्थक्षेत्र नसून औद्योगीक क्षेत्र आहे की काय अस येथील नागरीकांना वाटत आहे.
तरी वरील बाबींचा विचार करून कारखाने बंद करण्यात यावे अशी नम्र विनंती.
याबाबत खालील प्रशासन कार्यालयांना देखील निवेदन देण्यात आले आहे
१) मा. मुख्य अधिकारी
नगरपंचायत श्री क्षेत्र देहूगाव.
२) मा. पोलिस आयुक्त साहेब
पिंपरी चिंचवड.
३) मानव अधिकार आयोग.
४) महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ कार्यलय पुणे.
५) औद्योगीक आरोग्या सुरक्षितता व पर्यावरण विभाग कार्यालय, संभाजी नगर, चिंचवड.


0 टिप्पण्या