राष्ट्रीय सीलबम स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंचा दबदबा.
तामिळनाडू :ऑल इंडिया सिलंबम फेडरेशन व तामिळनाडू स्टेट सिलंबम असोसिएशन द्वारा सेंट जोसेफ सायन्स कॉलेज कडलूर, तामिळनाडू येथे दिनांक ५ ते ८ ऑक्टोबर दरम्यान आयोजित राष्ट्रीय सिलंबम चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली महाराष्ट्र सिलंबम स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघाने राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचा ठसा उमटवला महाराष्ट्र संघामधून राज्य संघटनेचे सचिव किरण अडागळे खजिनदार स्मिता धिवार प्रशिक्षक सुदर्शन सूर्यवंशी रविराज चखाले चंद्रपूर जिल्ह्यामधून दुर्गराज रामटेके मुंबई जिल्हा प्रदिप ओव्हाल हे संघा सोबत उपस्थित होते.
डिसेंबर महिन्यात होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड झाली आहे.
विजय खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे
मुले
सुरज बांगर -सुवर्णपदक, सोहम चोळकर -रौप्यपदक, राजवीर परांडेकर -रौप्यपदक, किरण वाळेकर -रौप्य पदक राज वायकोळे रौप्यपदक, गणेश चखाले -रौप्यपदक, वेदांत ठोंबरे -रौप्यपदक, संगम नागरगोजे -रौप्यपदक, अभिषेक खताळ -रौप्यपदक, शिवनाथ यादव -रौप्यपदक, पवन कनोजिया -रौप्यपदक, क्रिष्णा सिंग -रौप्यपदक, हर्षद गवारे -रौप्यपदक, सोहम केदार -रौप्यपदक, शिवदत्त सिंग -रौप्यपदक, उज्वल भोसले रौप्यपदक, क्रिश भोस्कर -रोप्यपदक, अभिराज नेटके -कांस्यपदक, अर्णव पाटील -कांस्यपदक, वेदांत मेत्रे -कांस्यपदक, स्वराज अडागळे -कांस्यपदक, नैतिक उनेचा -कांस्यपदक, नवाज पठाण -कांस्यपदक, दीक्षांत रामटेके -कांस्यपदक, अथर्व पातसे -कांस्यपदक, यश बालगुडे -कांस्यपदक.
सहभाग
शुभम गाडे, रुद्र बहुले, आदित्य जाधव, प्रणव शिंदे.
मुली
ऐश्वर्या देवेंद्रन -सुवर्णपदक, आराध्या नेटके -रौप्यपदक, तृप्ती यादव -रौप्यपदक, श्रुती शिंदे रौप्यपदक, प्रगती पालके -रौप्यपदक, ईश्वरी परांडेकर -रौप्यपदक, तनिष्का ठोंबरे -रौप्यपदक, दिव्या गेडाम -रौप्यपदक, तंनु आडे -रौप्यपदक, ऋतुजा कुलकर्णी -कांस्यपदक, आर्या गायकवाड -कांस्यपदक, प्रणिशा देवेंद्रन -कांस्यपदक, शौर्या रामटेके -कांस्यपदक.

0 टिप्पण्या