चाळीसगाव येथे पदवी प्रदान समारंभ उत्साहात साजरा

 हरी ओम औद्योगिक प्रशिक्षण संस्था,चाळीसगाव येथे पदवी प्रदान समारंभ उत्साहात साजरा  



चाळीसगाव प्रतिनिधी

ओम औद्योगिक प्रशिक्षण संस्था,चाळीसगाव येथे आज दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी शैक्षणिक वर्ष २०२१-२०२३ मधील उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा गुण गौरव व पदवी प्रदान समारंभाचे  आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन नानासो भिमराव हरी खलाणे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.ऋषिकेशजी महाले साहेब (सहा. मोटर वाहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन कार्यालय,जळगाव), काकासो.रामचंद्र यशवंत जाधव(नगरसेवक, न.पा.चाळीसगाव), बापूसो. भगवान अमरसिंग पाटील (नगरसेवक, न.पा.चाळीसगाव), श्री.दीपक उत्तम पाटील(नगरसेवक, न.पा.चाळीसगाव),श्री.मनोज रमेशराव भोसले(उद्योजक तथा संचालक ओम कृषी केंद्र,चाळीसगाव),श्री.एजाज शेख सर (विभागीय प्रकल्प अधिकारी,जीवन संजीवनी HR department)यांची प्रमुख उपस्थिती होती.


कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य श्री.भुषण खलाणे सर यांनी केले. अखिल भारतीय व्यवसाय ऑगस्ट 2023 परीक्षेत प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ,सन्मानचिन्ह व अंतिम प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले,तसेच संस्थास्तरीय क्रिकेट खेळात विजय टीमच्या खेळाडूंना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.PM Skill For Run पाच किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत संस्थेतील प्रशिक्षणार्थी कु.आकाश आण्णा जाधव याने द्वितीय क्रमांक मिळविल्या बद्दल त्याला  ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमात उत्कृष्ट वक्ता श्री.रामचंद्र जाधव यांनी ITI मधील प्रवेशित विद्यार्थ्यांची परिस्थिती बेताची असताना आय टी आय मध्ये प्रवेश घेतला त्या सर्व विद्यार्थ्यांना मी Intellgent म्हणजे कुशाग्र आणि प्रचंड बुद्धिमान समजतो.विद्यार्थ्याना यावेळी मार्कवंत आणि गुणवंत विद्यार्थी कसा असावा याचे देखील उदाहरणाच्या माध्यमातून उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले.उद्योजक श्री.मनोज भोसले यांनी देखील रोजगार करण्यापेक्षा स्वयंरोजगार कसा उभारता येईल याचे अनमोल मार्गदर्शन केले तसेच श्री.भगवान बापू पाटील यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. श्री ऋषिकेश महाले साहेब यांनी मनोगतात बदलत्या काळात स्पर्धेला कसे सामोरे जावे व अडचणीतून कसे मार्गक्रमण करावे व हे सर्व करत असताना रस्ता सुरक्षेचे व वाहतुकीचे नियम सर्व विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने पाळावेत याचे देखील उत्कृष्ट पद्धतीने मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषणात नानासो.भिमराव हरी खलाणे यांनी यशस्वी विद्यार्थी व पालक यांचे कौतुक व अभिनंदन केले तसेच संस्थेतील इलेक्ट्रिशियन ट्रेड मधील विद्यार्थी कु.शुभम एकनाथ माळी हा 98.50% गुण मिळवून नाशिक विभागात प्रथम तर महाराष्ट्र राज्यातून सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याच्या पुढच्या अभियांत्रिकी डिप्लोमा साठी होणारा शैक्षणिक खर्च संस्थेमार्फत  करणार असल्याची घोषणा यावेळी नानासाहेब भिमराव हरी खलाणे यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.व्ही.एस.देवरे सर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीते साठी कार्यक्रमाचे समन्वयक सौ.स्वाती खलाणे मॅडम,श्री.पी.बी. महाजन सर,श्री.एस.बी.वाघ सर,श्री.एस.एस.धनगर सर,श्री.डी.एस.महाजन सर,श्री.पी.व्ही.बागुल आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या