प्राची महिला सामाजिक संस्थेचा महिलांसाठी सामाजिक उपक्रम
वाशी नवी मुंबई मधील प्राची महिला सामाजिक संस्था चे वतीने महिलांसाठी नवनवीन उपक्रम राबविण्यात आले महिलांना रोजगार व मुलांचे संगोपन व शिक्षण तसेच शासकीय योजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या वतीने वह्या वाटप करण्यात आल्या
यावेळी अध्यक्ष लिला राठोड, रुपाली चिकने,रेखा समाजे,प्रमुख पाहुणे भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डागे व जनहित स्वयंसेवी संस्था चे अध्यक्ष हरी आल्हाट तसेच एवरेस्ट फाउंडेशनच्या सत्यभामा जैस्वाल काँग्रेस सेवादल चे सचिव देवकीबाई जाधव, जनहित न्यूज महाराष्ट्राचे उपसंपादक हर्षद पठाडे ,भटके विमुक्त सामाजिक संस्था चे नवीमुंबई अध्यक्ष सुरेश चव्हाण, यांच्या हस्ते मुलांना वही व खाऊ वाटप करुन प्राची महिला सामाजिक संस्थाचा वर्धापन दिवस व अध्यक्ष लिना राठोड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला
याप्रसंगी महिलांना बक्षीसे देऊन महिलांचा सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमात बोलताना सुंदर डांगे यांनी मुलांना शाळेत जाण्याकरिता लागणारे शैक्षणिक साहित्य पुरवले जातील व महिला शासकीय योजनांचे लाभ दिले जातील व सामाजिक उपक्रम राबविले जातील जसे की नशामुक्ती सफाई अनेक अश्या योजनाची माहिती दिली
या प्रसंगी रूपाली चिकणे,लता लोंढे .नीला सुर्यवंशी .हेमल भट.शुभांगी मोठे, लक्ष्मी, स्वामी,संगीता गव्हाणे,सीमा भल्या, शुभांगी मोठे,आडविन डिसोजा अनिल घाणेकर , मंजुषा देवळेकर, मीरा जाधव, संध्या ठोंबरे, माधुरी खरात, शमिका दळवी,असे अनेक मान्यवर व महिला आणि मुली मुले उपस्थित होते

0 टिप्पण्या