वृक्षारोपणात अग्रेसर "निर्भय सेवा " संस्थेचे संजय राठोड यांचा खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते गौरव
चाळीसगाव - दर वर्षीप्रमाणे या वर्षी देखील मिशन ग्रीन चाळीसगाव अंतर्गत निर्भय सेवा तर्फे 5 दिवसीय वृक्षारोपणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे.निर्भय सेवा ही सामाजिक संघटना गेल्या 4 वर्षांपासून 4 जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून आदिवासी विकास, रोजगार , पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, शिक्षण व्यवस्था, गो संवर्धन, आपत्कालीन मदत, शेती अशा विविध क्षेत्रात काम आणि मदत कार्य करत आहे. *आज या संस्थेचे अध्यक्ष संजय राठोड व पदाधिकारी यांचा गौरव जळगाव लोकसभा मतदारसंघाचे युवा खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
या वर्षी पहिल्या टप्प्यात 600 कडुलिंब, 600 आवळा, 100 सिसवं, 100 जांभूळ, 100 तामण या प्रजातीची लागवड आणि वाटपाचा कार्यक्रम देवळी तळेगाव जिल्हा परिषद गटांच्या डोंगराळ भागातील 18 गावामध्ये घेण्यात आला असल्याचे यावेळी संजय राठोड यांनी सांगीतले. खासदार उन्मेशदादा यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळत असते.आज देखील वृक्षाची लागवड करण्यासाठी रोपे नेत असताना खासदार उन्मेशदादा पाटील यांचे आशीर्वाद लाभले अशी भावना या मोहिमेचे आणि निर्भय सेवाचे अध्यक्ष राजदेहरे (गावठाण) चे सुपुत्र संजय ममतू राठोड यांनी व्यक्त केली.यावेळी गोविंद जगन राठोड, पवन ममराज राठोड (राजदेहरे गावठाण) उपस्थीत होते. निर्भय सेवा करत असलेल्या या समाजिक उपक्रमाचे कौतुक आणि पुढील वाटचालीसाठी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्यात .

0 टिप्पण्या