मुस्लिम बांधवाचा असाही जातीय सलोखा राखत सामाजिक कार्य

 मुस्लिम बांधवाने जातीय सलोखा दाखवत रेल्वेतुन पडलेल्या हिंदू बांधवांचे प्रेत मध्यप्रदेश ला केले रवाना 



चाळीसगांव

चाळीसगांव मुंबई ला मजुरीसाठी निघालेल्या प्रमोद रंजक नावाच्या मुलाचा काल सकाळी ११ वाजे दरम्यान हिरापूर ते चाळीसगाव दरम्यान रेल्वेतून पडून मृत्यू झाला.

प्रमोद ग्वालियर वरून मुंबईकडे रेल्वेने आपल्या मित्रांसोबत जात होता चाळीसगाव ते हिरापूर दरम्यान त्याला लघु शंका लागल्याने त्याने आपल्या मित्रांना सांगितले की मी लघवी करून येतोय थोड्याच वेळात लोक आरडा ओरड करत मुलगा रेल्वेतून पडला तेवढ्यात त्याची मित्र कोण पडला म्हणून बघण्यास गेले तर तो आपला मित्रच असे समजताच त्याच्यासोबत असलेली मित्रही घामाघुम झाले.आणि बघितले तर त्याचा मृत्यू झालेला होता त्यांनी लागलीच आपल्या गावाकडे फोन फिरवला .

त्यानंतर ग्वालियर हुन सामाजिक कार्यकर्ते मोंटी शेख यांच्या मित्राचा फोन आला.मॉन्टी शेख हे घटनास्थळी दाखल होऊन मध्य प्रदेशातील विजयपुर येथे रवाना केले. अशा कठीण प्रसंगात जातीय मतभेद विसरून जातीय सलोखा दाखवत  मदतीचा हात दिला.

आपल्या देशात अनेकदा जातीयवादाची प्रकरण पाहायला मिळाली. मात्र चाळीसगांव हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असल्याचे अनेक वेळेस बघायस मिळाले. या हिंदू मुस्लिम एकता असल्याचे मोन्टी शेख यांनी जातीपेक्षा माणुसकीच महत्त्वाची आहे, याचं उत्तम उदाहरण त्यांनी दाखवून दिलयं म्हणून सर्व स्तरावरून सामाजिक कार्यकर्ते मॉन्टी शेख यांचे कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या